भाजीपाला व फळे विक्री घरपोच,ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध

नांदेड जिल्ह्यात संचारबंदीच्या अनुषंगाने सुधारीत व अतिरिक्त निर्देश निर्गमीत

नांदेड दि. 11 :- कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 12 जुलै रोजी मध्यरात्री पासून ते 20 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर संचारबंदी लागू केली आहे. निर्गमीत 10 जुलै रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने यात अतिरिक्त निर्देशाचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केला आहे.

या बाबींना सकाळी 7.00 ते 10.00 या कालावधीतच परवानगी

आठवडी बाजार व भाजीपाला / फळ मार्केट बंद राहतील. भाजीपाला व फळे विक्री करणारे विक्रेते यांना एका ठिकाणी न थांबता हातगाडीवर गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सुरक्षा नियमाचे पालन करीत घरपोच विक्री करता येईल. दुध विक्रेत्यांना एका ठिकाणी थांबून दुध विक्री करता येणार नाही. त्यांना गल्ली, कॉलोनी, सोसायटीमध्ये जाऊन घरपोच विक्री करता येईल. जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. घरगुती गॅस घरपोच सेवा देण्यात यावी. त्याकरिता गॅस वितरक कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असेल. या बाबींना सकाळी फक्त 7.00 ते 10.00 या कालावधीतच मुभा राहील.

ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध

नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील. त्याव्यतिरिक्त बँकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणत्याही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध केला आहे.याचबरोबर मान्सुन संबंधित कामे पुर्ण करण्यासाठी यापुर्वी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून उक्त कामे चालू ठेवण्यास मुभा राहिल. कोणतेही खाजगी दुचाकी, तिनचाकी, चारचाकी व इतर वाहनाद्वारे व्यक्तींना प्रवासास बंदी राहिल. परंतू अत्यावश्यक वैद्यकिय कारणासाठी तसेच परवानगी प्राप्त असलेल्या राज्याअंतर्गत, अंतरराज्य प्रवासाच्या वाहतुकीस मुभा राहिल. सदर अतिरिक्त व सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *