औरंगाबादेत ३०० कोरोनाबाधित,सात मृत्यू

जिल्ह्यात 5636 कोरोनामुक्त, 3731 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 137 जणांना (मनपा 107, ग्रामीण 30) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5636 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 300 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 243, ग्रामीण 57 ) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9744 झाली आहे. आजपर्यंत एकूण 377 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3731 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुपारनंतर 173 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 81 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवरील 16 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 64, ग्रामीण भागात 01 रुग्ण आढळलेले आहेत.

जिल्ह्यातील ४२ ते ६५ या वयोगटातील सात करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ३७७ झाली आहे. तसेच गुरुवारी (१६ जुलै) दिवसभरात ३०० नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ९७४४ झाली आहे. त्याचवेळी आतापर्यंत ५६३६ करोनाबाधित हे करोनामुक्त झाले आहेत.

रांजणगाव एमआयडीसी परिसरातील ५० वर्षीय पुरुष रुग्णाला ६ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब चाचणी अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी (१५ जुलै) दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी मृत्यू झाला. गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील पोस्ट ऑफिसजवळील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला १४ जुलै रोजी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातून घाटीत दाखल करण्यात आले होते. दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब चाचणी अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा बुधवारी दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. आयोध्या नगर (बजाज नगर) येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाला ७ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी ९ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला. हडको कॉर्नर येथील ४२ वर्षीय महिला रुग्णाला ३ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टनुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता मृत्यू झाला. फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथील बोरगाव गणपती येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ६ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा गुरुवारी दुपारी बारा वाजता मृत्यू झाला. भावसिंगपुरा येथील ५६ वर्षीय महिला रुग्णाला १२ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण ही करोनाबाधित असल्याचे दुसऱया दिवशीच्या चाचणी अहवालावरुन स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा गुरुवारी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. तसेच बायजीपुऱ्यातील ५४ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या ३७७ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

गुरुवारी १३७ बाधित हे करोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. यामध्ये शहरातील १०७, तर ग्रामीण भागातील ३० व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत ५६३६ करोनाबाधित हे करोनामुक्त झाले आहेत व आतापर्यंत ३७७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि सध्या ३७३१ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

महापालिका हद्दीत २४३

शहर परिसरातील बाधितांमध्ये न्याय नगर, गारखेडा येथील १, संसार नगर १, कांचनवाडी १, छावणी १, एन-१२, सिडको १, पीर बाजार, उस्मानपुरा १, एन-चार, सिडको २, बेगमपुरा ३, प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड १, एन-११, हडको ३, चिकलठाणा १, जयभवानी नगर १, पीर बाजार १, शिव नगर १, मिलकॉर्नर १, एन-सात सिडको येथील २, उल्कानगरी १, पडेगाव ३, बीड बायपास १, सातारा परिसर २, क्रांती नगर १, उस्मानपुरा १, होनाजी नगर ३, हमालवाडा १०, प्रताप नगर २, केशरसिंगपुरा ५, नारळीबाग २, विजय चौक, गारखेडा २, जय नगर, बीड बायपास १, शिवशंकर कॉलनी १, एन-१२, सिडको १, भारत नगर, गारखेडा १, सहारा पार्क २, सारा वैभव रोड ४, नारेगाव, पडेगाव १, एन-नऊ, श्रीकृष्ण नगर ३, मयूर पार्क २, विठ्ठल नगर १, राजे संभाजी कॉलनी, जाधववाडी १, नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, नागेश्वरवाडी २, दौलताबाद टी पॉईंट ३, भवानी नगर ९, बालाजी नगर १, विश्वभारती कॉलनी १, भानुदास नगर ४, पद्मपुरा ३, प्रगती कॉलनी २, न्याय नगर ४, जयभवानी नगर १, हनुमान नगर १२, काका चौक, पद्मपुरा ६, पहाडसिंगपुरा ३, चिकलठाणा २, शांतीपुरा ३, वेदांत नगर २, एन-चार, सिडको २, सिडको २, पन्नालाल नगर १, बन्सीलाल नगर १, केसरसिंगपुरा १, छावणी परिसर १, उस्मानपुरा २ आदी भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ५७

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये रांजणगाव येथील २, पोस्ट ऑफिसजवळ, गंगापूर १, अक्षदपार्क, कुंभेफळ १, करमाड १, मोठी आळी, खुलताबाद ३, पळसवाडी, खुलताबाद ६, वेरूळ २, मोरे चौक, बजाज नगर २, आयोध्या नगर, बजाज नगर ४, राधाकृष्ण सोसायटी, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, बीएसएनएल गोडाऊनजवळ, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, जयभवानी चौक, बजाज नगर २, गोंडेगाव, सोयगाव २, शास्त्री नगर, वैजापूर १, गोंदेगाव, सोयगाव येथील २, मोरे चौक ३, वडगाव, साईनगर, बजाज नगर ३, सरस्वती सोसायटी, बजाज नगर २, बजाज नगर १, पियुष विहार, आनंद जनसागर, बजाज नगर १, पारिजात नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर १, एमआयडीसी पोलिस स्टेशन परिसर, वाळूज १, सातारा परिसर १, वाळूज १, अज्वा नगर, वाळूज २, अजिंक्यतारा सोसायटी, वाळूज ३, संघर्ष नगर, घाणेगाव १, साठे नगर, वाळूज १, स्नेहनगर, कन्नड १, वैजापूर १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *