दूरदृष्टीचा अर्थसंकल्प,हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेचा मार्ग बदलणारा-केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा

नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राला इतर क्षेत्रांच्या बरोबरीने आणला

नवी दिल्‍ली:-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दूरदृष्टीचा अर्थसंकल्प असे संबोधत हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेचा मार्ग बदलणारा ठरेल असे म्हंटले आहे. अमित शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनवेल आणि स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षातील नवीन भारताचा पाया घालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी यासाठी अभिनंदन करतो, असे शाह यांनी म्हटले आहे.

39.45 लाख कोटीचा हा अर्थसंकल्प हा कोविड काळातही भारताची वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा निदर्शक आहे. वित्तीय तूट लक्ष 6.9 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांपर्यंत कमी करणे ही मोठी उपलब्धी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला वित्तीय तूट 4 टक्क्यांपर्यंत कमी करता येईल याबद्दल मला विश्वास आहे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे

नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रावरील पर्यायी किमान कर ATM चा दर 18.5% वरुन 15% वर आणला. त्याचबरोबर अधिभारही 12% वरुन 7% वर आणला. त्यामुळे अनेक दशके सहकार क्षेत्रावर होत असलेल्या अन्यायाला पूर्णविराम मिळून ते इतर क्षेत्रांच्या स्तरावर आले आहे. नरेंद्र मोदींचा ‘सहकार से समृद्धी’ या निश्चयाचे हे द्योतक आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे.