अर्थसंकल्प, नवभारताला नवी प्रतिमा बहाल करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याचे नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

नवी दिल्‍ली,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी हा अर्थसंकल्प नवभारताला नवी दृष्टी देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, की हीच या 21 व्या शतकाची प्रतिमा आहे,आपली आर्थिक उद्दिष्टे आणि प्राधान्यक्रम या अर्थसंकल्पाने आधीच ठरवले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शेतकरी, ग्रामीण भारत, कृषी भारत आदिवासी भारत, गाव, गरीब मजूर जनता अशा सर्व क्षेत्रांतील लोकांच्या कल्याणाला या अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे, असे श्री गडकरी म्हणाले. दुसरे सर्वोच्च प्राधान्य पायाभूत सुविधांना आहे. भारतमाला आणि सागरमाला यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाल्याने मी खरोखरच आनंदात आहे, असे गडकरी म्हणाले आणि आता त्यासोबत पर्वतमाला हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रोप वे, केबल कार ही देशाच्या विशेषतः डोंगराळ भागासाठी एक उत्तम भेट आहे. ते पुढे म्हणाले की याचा लाभ ईशान्येकडील प्रदेश , उत्तराखंड, हिमाचल आणि काश्मीरला होईल. श्री गडकरी म्हणाले, की केवळ वस्तूंची ने-आण नव्हे तर पर्यटनासाठी देखील हे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे अधिक रोजगार क्षमता निर्माण होऊ शकते. ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प पंतप्रधानांच्या नवीन दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे .