राष्ट्रीय मतदार दिन : वैजापूर तालुक्यातील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा गौरव

वैजापूर ,२७ जानेवारी / प्रतिनिधी :-मतदार नोंदणीत राबवलेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमाबद्दल वैजापूर तालुक्यातील  मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेस राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुंबई येथील मुख्य निवडणुक कार्यालयाने आयोजित कार्यक्रमात पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अभिनेता व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी पुरस्कार प्रदान केला. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड व सचिव आप्पासाहेब उगले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.तसेच मराठवाडा विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उप जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. भारत कदम यांनाही मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी सन्मानित केले.

याप्रसंगी प्रधान सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपा़डे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. दिपक पवार, संस्थेचे सुनील उगले, योगेश उगले उपस्थित होते.