संस्कार प्रबोधिनी विद्यालयात ध्वजारोहण

जालना ,२७ जानेवारी /प्रतिनिधी :- संस्कार प्रबोधिनी विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित भास्करराव काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Displaying IMG-20220126-WA0018.jpg

या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी स.भु. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक  विनायकराव देशपाडे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरेश  कुलकर्णी ,केसापूरकर सचिव विजय देशमुख, माजी जिल्हा संघचालक विनायकराव देहडकर, मुख्याध्यापक श्रीमती रिमा पोळ  आणि ईश्‍वर वाघ यांची उपस्थिती होती.  

Displaying IMG-20220126-WA0016.jpg

मान्यवरांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील व डॉ. होमी भाभा या स्पर्धात्मक परीक्षेतील गुणवंताचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक भागवत मराठे यांनी केले. अतिथीचा परिचय श्रीमती अनिता रावस  यांनी करुन दिला. तसेच देशभक्तीपर गीत गायन श्रीमती रूपाली वैष्णव यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचलन बाळासाहेब शिंदे व श्रीमती माया बोरगांवकर यांनी केले. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष फलक लेखन सजावट श्रीमती वंदना जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुवर्णा पाठक यांनी केले.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास शिंदे, अंबादास नंनवरे, श्रीमती सिमा आरडे, श्रीमती वैशाली वाघमारे, विपुल धोत्रे, श्रीमती राठोड, श्रीमती सविता यादव, वर्षा कुलकर्णी, रामदास कुलकर्णी, किरण धुळे, विठ्ठल नंनवरे, पवन साळवे, नितिन काळे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.