राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाने परस्पर सहकार्याने उपक्रम राबवावेत – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Displaying Archaeology -5.JPG

औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :-   राज्यातील पुरातन वारसा स्थळे,ऐतिहासिक ठिकाणांचे जतन संवर्धन होण्याच्या दृष्टीने राज्य पुरातत्व विभागाने केंद्रीय पुरातत्व विभागासोबत परस्पर सहकार्यातुन उपक्रम राबवण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिल्या.

केंद्रीय पुरात्तव विभागाच्या कार्यालयात आयोजित मराठवाड्यातील केंद्रीय व राज्य पुरातत्व कामासंदर्भातील आढावा बैठक श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली , त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस अधिक्षण पुरातत्वविद औरंगाबाद मंडळाचे डॉ. मिलन कुमार चावले, संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचेडॉ. तेजस गर्गे, सहायक संचालक औरंगाबाद विभाग अजित खंदारे, यांच्यासह केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाचे  सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Displaying Archaeology -2.JPG

श्री.देशमुख यांनी  औरंगाबाद विभागात केंद्रीय तसेच राज्य पुरातत्व विभागाच्यावतीने ऐतिहासीक स्थळांच्या जतन संवर्धनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेऊन  राज्यातील सर्व वारसा स्थळांचे योग्य पद्धतीने संवर्धन झाले पाहीजे . तसेच त्या ठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने ही पूरक सोयी सुविधांची उपलब्धता असली पाहीजे , असे सूचित करुन राज्य पुरातत्व विभागाने केंद्रीय पुरातत्व विभागासोबत समन्वय साधून संयुक्तिकरित्या वारसा स्थळांच्या सुरक्षा,सुशोभिकरण आणि संवर्धनाच्यादृष्टीने उपक्रम राबवल्यास अधिक गतिमानतेने संबंधित कामे पूर्ण करणे शक्य होईल असे सूचित केले. तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन व्यापक प्रमाणात नाविन्यपूर्ण उपक्रम,संकल्पनांचे आदानप्रदान होण्यासाठी कार्यशाळांचे नियोजन करावे. औरंगाबाद शहरातील कमल तलाव व इतर स्मारके राज्य संरक्षित करण्याबाबत संबंधितांनी पाहणी करावी.  तसेच वेरुळ महोत्सव सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी  संबंधितांना यावेळी दिल्या.

Displaying Archaeology -1.JPG

केंद्रीय पुरातत्व विभागाचे श्री.चावले यांनी केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत बिबिका मकबरा, दौलताबाद,अजिंठा,वेरुळ लेणी येथील संवर्धन कामाची माहिती देऊन घृषणेश्वर मंदिर व इतर स्मारकांच्या विकास कामामध्ये राज्य शासनाकडून अपेक्षित सहकार्याबद्दल माहिती दिली.  तसेच राज्य पुरातत्व विभाग औरंगाबाद व नांदेड या दोन्ही विभागांतर्गत करण्यात आलेल्या पुरातन स्थळांच्या जतन कामांची माहिती श्री.खंदारे यांनी यावेळी दिली.