विद्यापीठाने १२७ कोटींच्या घोटाळा प्रकरणी काय कार्यवाही केली ?औरंगाबाद खंडपीठाने केली विचारणा

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध कामांमधून १२७ कोटींच्या घोटाळाप्रकरणी शासन नियुक्त तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डाॅ. आर. एस. धामणस्कर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या चौकशीनंतरच्या अहवालाच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली, अशी विचारणा करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली आहे.या प्रकरणी न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी १ फेब्रुवारी रोजी कार्यवाहीच्या संदर्भाने अहवाल सादर करण्याचे आदेश शासनासह विद्यापीठाला दिले आहेत.

याप्रकरणी नवनाथ कुंडलिक देवकते यांनी ॲड.अजिंक्य काळे यांच्यामार्फत याचिका दाखल केलीआहे.याचिकेनुसार विद्यापीठात १२७ कोटींचा घोटाळा झाला होता.चौकशीसाठीडाॅ.धामणस्कर यांच्याअध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.समितीनेचौकशीकरून एक अहवाल सादर केला.त्याअहवालानुसार अनेक कामांमध्ये दोष, अनियमितता आढळूनआली. शैक्षणिक विभागाकडील संलग्निकरण शुल्क वसुलीची नोंदवही अद्ययावत नसून त्यामध्ये १७ कोटी ९६ लाख रुपयांच्या नोंदी घेतलेल्या नाहीत.निविदेविना खरेदीची रक्कम २६ कोटी ५२ लाख रुपये आहे. सदोष खरेदीप्रक्रियेद्वारे उच्च दर स्वीकारून ६ कोटी ८६ लाख रुपयांच्या विद्यापीठ निधीचे नुकसान केले आहे.विद्यापीठातील विविध विभागांनी कामांच्या संदर्भाने सदोष प्रदान करून ४ कोटी ६७ लाख अतिरिक्त प्रदान केले. गंभीर अनियमितेद्वारे १ कोटेी४८ लाख खरेदी केली.दरपत्रके प्राप्त नसताना ७ कोटी ७३ लाख रुपयांची खरेदी केली.चौकशी समितीस ६६ कोटी ९७ लाख रुपयांची खरेदी अभिलेखे विद्यापीठाने दाखवलेली नाहीत.या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल,विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान गतवर्षी सांगण्यातआले होते.