विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी एच बी कहाटे यांची निवड

खुलताबाद,३ जानेवारी /प्रतिनिधी :- येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एच बी कहाटे यांची महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत आय आरडीपी समाजकल्याण संघटनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल कहाटे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 
 महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत आय आरडीपी समाजकल्याण संघटना जिल्हा औरंगाबाद कार्यकारणी निवड करण्यासाठी पंचायत समिती औरंगाबाद येथे  सहाय्यक गट विकास अधिकारी के टी जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी  जी एस पवार व विभागीय संघटक  शिवाजी साळूंके यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्य़ातील सर्व विस्तार अधिकारी यांची बैठक झाली.
 या बैठकीत सर्व संमतीने संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी अशी: अध्यक्ष एच बी कहाटे, सचिव एम सी कुंटे, उपाध्यक्ष एस आर म्हस्के, उपाध्यक्ष महिला श्रीमती आर व्ही राठोड, कोषाध्यक्ष डी एन मगर , संघटक डी ए जायभाये, सहसचिव एस डी चव्हाण ,सदस्य डी एल बागुल, पी बी दौड , बी एन घुगे ,एस ए द्वारकोंडे, बी टी साळवे , ए एस घोडके.