कोरोनाची लस घेतलेली नसतानाही दोन एमबीबीएस डॉक्टर भावंडांसह दोन क्ष-किरण तज्ज्ञांना पोलिस कोठडी

औरंगाबाद,१५ डिसेंबर /प्रतिनिधी:- कोरोनाची लस घेतलेली नसतानाही  ६०० ते एक हजाररुपये घेऊन दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या दोन एमबीबीएस 

डॉक्टर भावंडांसह 2 क्षकिरण तज्ज्ञांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी दि.१४ रात्री अटक 

केली.तरया गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोन परिचारिकांचा शोध सुरू आहे. शंभरपेक्षा अधिक जणांना लस घेतल्याचे बनावटप्रमाणपत्र दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

डॉ. शेख रझिउद्दीन फहीमउद्दीन शेख रहीम (२७, दिलसर कॉलनी, आमखान मैदानाजवळ), डॉ. शेख मोहियोद्दीन ऊर्फ अदनान शेख फहीम (३६, रा. मनुर ता. वैजापुर ह.मु. दिलरस कॉलनी), क्ष-किरण तज्ज्ञ मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अशफाक (२१, रा. गल्ली नं. ३ गणेश कॉलनी) व अबुबकर अल हमीद हादी अल हमीद (२३, रा. रहेमानिया कॉलीन आझाद चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखडे यांनी बुधवारी  दिले.तर शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका आढाव आणि मनूर प्रा. आ. केंद्रातील परिचारिका शहनाझ शेख यांचा शोध सुरू असल्याची माहिती जिन्ही पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी दिली.

या प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी फिर्याद दिली.जिन्सीचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी शहरात काही जण लस घेतलेली नसतानाही 

त्यांना दोन्ही मात्रा दिल्याचे प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती दिली. त्यानुसार तपास केला असता व्हीआयपी फंक्शन 

हॉलनजीकच्या पल्स रुग्णालयाजवळ काही व्यक्ती बनावट प्रमाणपत्र मिळवून देत असल्याचे कळल्यानंतर दोन बनावट ग्राहक पाठवून खात्री पटवून घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत डॉ. शेख रझिउद्दीन व मोहम्मद मुदस्सीर, अबुबकर हे शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉ. शेख मोहियोद्दीन याच्यामार्फत लस न घेताच बनावट प्रमाणपत्र तयार करुन देत असल्याचे समोर आले.

तपासादरम्यान शेख रझिउद्दीनच्या मोबाईल फोनमध्ये शेख बिलाल, हिंगोरा मुनाफ यांना शेहनाज शेख तर पठाण ताहेर खान, बिल्कीस नसीम अहेमद, आणि काजी अमीरुद्दीन सोहील यांना आढाव व्‍दारे लस दिल्याचे प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल मिळून आली. तर अबुबकर याच्‍या मोबाइल मधुन समीर शेख, मोहम्मद इलियास शेख, फातिमा अली, अमीनाश शाहा, मोहम्मद ताकीर शेख, यांना आढाव व्‍दारे लस दिल्याचे प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल सापडल्या.

याबाबत पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता ते  टाळाटाळ करु लागले, त्‍यामुळे पोलिसांचा संशय बळावला. परस्परांच्या मोबाईलवरील संभाषणातून बनावट प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईल फोन आदी साहित्य आरोपींकडून जप्त करण्यात आल्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या दोन्ही डॉक्टरांचा एक भाऊही डॉक्टर असून संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित आहे.

आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीच्‍या इतर साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍हा करतांना आरोपींनी वापरलेले साहित्‍य जप्‍त करायचे आहे. आरोपींनी अशा प्रकारे किती नागरिकांना खोटे प्रमाणपत्र दिले याचा तपास करुन ते जप्‍त करायचे आहेत. बनावट प्रमाणपत्र देण्‍याचे मोठे रॅकेट असून त्‍या अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली.