वैजापूर ते कोपरगाव हद्द या 6 कि.मी.रस्त्याच्या कामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर ; आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,४ डिसेंबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैजापूर ते कोपरगाव हद्द या 6 कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरण कामासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आ. रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष साबेर खान होते.

दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर मालवाहतूक व रहदारी वाढली असल्याने या रस्त्याचे नूतनीकरण मजबुतीकरण व्हावे यासाठी आ. रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.राज्य शासनाच्या अर्थसंकल्प 2019-20 शिर्षकांतर्गत वैजापूर ते कोपरगांव हद्द कि.मी.134/00 ते 140/00 या 6 कि.मी.रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण या कामासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

कोरोनामुळे दीड वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. आता या रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून आज आ. बोरणारे यांच्याहस्ते रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.या प्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके,जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, संजय पाटील निकम, नगरसेवक प्रकाश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.काकड, कल्याण पाटील जगताप, खुशालसिंग राजपूत, पोलीस पाटील गुलाबराव साळुंके, अंकुश पाटील हिंगे, बाळासाहेब जाधव, संजय बोरणारे, भाऊसाहेब गलांडे, खलील मिस्तरी, वसंत त्रिभुवन, कय्युम सौदागर, अमोल बोरणारे, डॉ.संतोष गंगवाल, महेश बुणगे, डॉ.निलेश भाटिया, प्रमोद कुलकर्णी, शेख रियाज, बिलाल सौदागर,युवासेनेचे आमिर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, आवेज खान, पारस घाटे, मोहनराव साळुंके, सलीम वैजापुरी, बळीराम राजपूत यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.