90 कोटी रुपयांच्या 12.9 किलो हेरॉईनसह 2 जणांना अटक

नवी दिल्ली ,१३ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- अंमली पदार्थ  तस्करीविरोधात  लढा अधिक तीव्र करत सीमाशुल्क अधिकार्‍यांनी  नवी दिल्ली येथील  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी एका यशस्वी कारवाईत 12 आणि 13 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्री नैरोबी (केनिया) येथून अबू धाबी मार्गे आलेल्या युगांडाच्या दोन  नागरिकांकडून 12.9 किलो हेरॉईन जप्त केले.  जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत प्रचलित आंतरराष्ट्रीय किमतीनुसार अंदाजे 90 कोटी रुपये आहे.

युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण 12.900 किलो क्रिस्टलिन  हेरॉईन जप्त करण्यात आले. 

Picture 3
Picture 4

या कॅलेंडर वर्षात दिल्ली सीमाशुल्क विभागाने  100 किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. 26 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.