भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 104.04 कोटीहून अधिक

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.20%, मार्च 2020 पासून सर्वोच्च

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 16,156 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (1,60,989) ही गेल्या 243 दिवसातली सर्वात कमी संख्या

नवी दिल्ली,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी:-भारतात गेल्या 24 तासात  49,09,254  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 104.04 कोटीपेक्षा अधिक (1,04,04,99,873)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,03,62,667 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 17,095 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,36,14,434 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.20% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे. 

सलग 123 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.मागील 24 तासात 16,156 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,60,989 इतकी असून ही  संख्या गेल्या 243  दिवसातली  सर्वात कमी आहे. देशात सक्रीय  रुग्णांची संख्या  एकूण उपचाराधीन  रुग्णांच्या 0.47% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 12,90,900 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.44 कोटीहून अधिक  (60,44,98,405) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.19% असून गेले  34 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.25% असून गेले 24 दिवस 2% पेक्षा कमी आणि 59  दिवस  3% पेक्षा कमी आहे.