तिर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेब पाटील

चाकूर ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  मंदिरातील स्वच्छता, नियोजन व भाविक भक्तांसाठी करण्यात आलेल्या सुविधा अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत. विश्वस्त मंडळाचे व गावकऱ्यांचे काम पाहून मी भारावून गेलो. जनमाता देवी मंदिर खुर्दळी (ता.चाकूर) या तिर्थक्षेत्राच्या उर्वरित विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन  शनिवारी  राज्याच्या पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
         नवरात्री उत्सवानिमित्त नवसाला पावणाऱ्या जनमाता आई देवस्थान मंदिराच्या विकास कामाचा व उणिवांचा आढावा घेण्यासाठी आमदार पाटील आले होते. यावेळी त्यांच्या सोबत अनिल वाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, राष्ट्रवादी किसान सभा तालुकाध्यक्ष रामदास घुमे, मधुकर कांबळे, युवक राष्ट्रवादी चे माजी तालुकाध्यक्ष संदीप शेटे, युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, विध्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, धनंजय जाधव, दिलीप पाटील, पाराप्पा शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.


हिंदू – मुस्लिम भाविक भक्तांसह इतर धर्मीय श्रद्धाळू नवरात्र उस्तव काळात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी आहे. नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते. येथील बकरा बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे. नवरात्रौ उत्सव  काळात येथे आबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अन्नदात्यांकडून अन्नछत्रही चालवले जाते.