चिंताजनक :लातूर जिल्ह्यात १८ रुग्णांचा मृत्यू 

१६६३ नवे पॉझिटिव्ह आढळले; ७७५ जणांना डिस्चार्ज

लातूर,१५ एप्रिल /प्रतिनिधी 

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. गुरुवारी दिवसभरात १६६३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ७७५ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

१५८८ आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये ५७७ तर प्रलंबित अहवालांपैकी ६८२ पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. रॅपिड ॲँटिजेनच्या ३४३१ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ९८१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. असे एकूण १६६३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या डीसीएच सेंटरमध्ये ६९८, कोविड केअर सेंटरमध्ये १९७३, डीसीएचसीमध्ये ९९३ व होम आयसोलेशनमध्ये १० हजार १९४ असे एकूण १३८५८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. १८ रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा ८३९ झाला आहे. आज ७७५ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३५४९३ जण बरे झाले आहेत.
सध्या मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ४४, बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर १०२, ऑक्सिजनवर ९५१ रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह व मृत्युमुखी पडणारांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी घरातच सुरक्षित राहून कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे.

लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना मदत केंद्राची स्थापना

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच मान्यताप्राप्त कोव्हिड-१९ रुग्णांना बेडची उपलब्ध्ता, तसेच बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलचे नाव, त्यामध्ये विना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनसह बेड व व्हेंटीलेटर बेड इत्यादीची माहिती देण्यासाठी व नागरिकांच्या कोव्हिड संदर्भात इतर समस्यांबाबत संपर्क करण्याकरिता मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 02382-223002 या टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
नागरिकांनी फोन करुन या संदर्भातची माहिती उपलब्ध्द करुन घ्यावी. तसेच सदरच्या नियंत्रण कक्षात २४ तास चार कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट मध्ये नेमणूका केलेल्या असून आपणास बेड उपलब्धेबाबत २४ तास माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.