खुलताबाद उरुसाला ‘नो मास्क नो एन्ट्री’ – नियमांचे पालन करण्याचे तहसीलदारांच्या सूचना

खुलताबाद,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- येथील हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या ७३५ व्या उरुसाला १२ ऑक्टोबर पासून सुरुवात होत असून  धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी  सरकारने यात्रा – उरुसाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्याठिकाणी दुकाने लावण्यास परवानगी मिळणार नाही. सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी म्हटले आहे.

Displaying IMG-20211009-WA0042.jpg

नगरपरिषदेच्या सभागृहात उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उरूस व्यवस्था समितीची बैठक झाली. तसेच, हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या दर्ग्यात जाणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क असणे आवश्यक असून, सुरक्षित अंतर पाळणे, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, आवाहनही उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी नागरिकांना केले आहे. यानंतर राज्य सरकारने धार्मिक स्थळांसाठी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उरूस व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.करोना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी गर्दी होऊ नये. गर्दी टाळण्यासाठी काळजी घ्यावी. गर्दीचे योग्य नियोजन करावे. याठिकाणी आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाय योजना ऑडिओ, व्हिडीओ, बॅनरच्या माध्यमातून जनजागृती  करावी. उरूस मैदानावर दुकाने लावण्यात येणार नाही. यावर्षी कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाही. कोव्हीड चाचणी अनिवार्य आहे आजारी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व अधिकारी कर्मचारी, उरूस व्यवस्था समितीचे पदाधिकारी यांना कोव्हीड १९ चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन यांनी  जिल्हाधिकाऱ्यांनी उरूस व्यवस्था समितीची बैठक घेऊन भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत आग्रही भूमिका घेतली. 

यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजिलत अहमद, सचिव मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे,  वैद्यकीय अधीक्षक डॉ सुहास जगताप, नगराध्यक्ष एस एम कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मोहंमद शरफोद्दीन रमजानी, महंमद नईम महंमद बक्ष, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता दिलीप कोलते, अभियंता सागर सावजी, उपस्थित होते.

अशी आहे नवी नियमावली

प्रत्येकाने ६ फुटांचे अंतर पाळणे. गरजेचे मास्कचा वापर करणे. बंधनकारक हँड सॅनिटायझरने वारंवार हात धुणे (४० ते ६० सेकंदांसाठी) आवश्यक. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे आवश्यक.
लक्षणे आढळल्यास त्वरीत हेल्पलाइनशी संपर्क साधणे गरजेचे. थुंकण्यास मनाई. थुंकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

सर्व धार्मिक स्थळांनी काय काळजी घ्यावी?

प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीलाच मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जावा. मास्क घातलेल्या व्यक्तीलाच प्रवेश दिला जावा. कोविड १९ ची माहिती देणारे पोस्टर्स लावणे बंधनकारक  एका वेळी किती जणांना प्रवेश द्यावा हे धार्मिक स्थळाच्या आकारमानावर ठरवण्यात यावे. पादत्राणे, बूट आपल्या गाडीमध्येच ठेवावेत. किवा त्याच व्यक्तीने वेगळी व्यवस्था करावी. गर्दीचे नियोजन करावे, तसेच पार्किगची योग्य व्यवस्था आणि नियोजन करावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. धार्मिक स्थळाबाहेर असलेली दुकाने, स्टॉल्स उरूस कालावधीत बंद ठेवावेत करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळावेत.
रांगेत उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी योग्य नियोजन करून योग्य मार्किंग करावे. लोकांच्या प्रवेशासाठी आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. रांगेत सहा फुटांचे अंतर पाळावे. धार्मिक स्थळाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी हात आणि पाय साबणाने स्वच्छ धूणे आवश्यक सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल. अशा प्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. एअर कंडिशन, आणि व्हेंटिलेशनबाबत सीबीडब्ल्यूडीचे पालन करणे आवश्यक आहे. पुतळे, मूर्त्या, पवित्र पुस्तकांना स्पर्श करण्यावर बंदी  एकत्र जमण्यास प्रतिबंध लोकांनी नमस्कार करताना एकमेकांना स्पर्श करू नये. प्रार्थनेसाठी बसण्यासाठी सार्वजनिक चटईचा वापर टाळावा. प्रत्येकाने आपली स्वतंत्र चटई आणावी.
प्रसाद, पवित्र पाणी अशा गोष्टींना धार्मिक स्थळांमध्ये परवानगी नसेल. धार्मिक स्थळांच्या आवारात सॅनिटायझेशनची, हात-पाय स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात यावी.  धार्मिक स्थळांची वारंवार स्वच्छता करणे बंधनकारक. धार्मिक स्थळांमधील फरशी, जमीन वारंवार स्वच्छ करणे बंधनकारक. धार्मिक स्थळांमध्ये आलेल्या व्यक्तीने काढून टाकलेल्या मास्क, ग्लोव्हजी योग्य ती विल्हेवाट लावणे बंधनकारक. धार्मिक स्थळांमधील कर्मचाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक. त्यांनी आठवड्याला कोविड चाचणी करणे बंधनकारक. संख्या, जागा आणि अंतर प्रोटोकॉल प्रत्येक उपासनास्थळाद्वारे पालन केले जाईल, त्यावर पोलिस आणि तहसीलदारांमार्फत लक्ष ठेवले जाईल.

धार्मिक स्थळांमध्ये करोना संशयित आढळल्यास काय काळजी घ्यावी?

अशी व्यक्ती आढळल्यास तिचे इतरांपासून एका वेगळया खोलीत विलगीकरण करण्यात यावे.त्या व्यक्तीला मास्क घालण्यास द्यावा, तिची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी. जवळच्या क्लिनिकला किंवा रुग्णालयाला कळवावे, तसेच जिल्हा हेल्पलाइनशी संपर्क साधावा. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तेथील जोखमीचे मूल्यमापन करण्यात यावे आणि आवश्यकता असेल तर त्यावर कार्यवाही करावी.
व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यास  धार्मिक स्थळाचे निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक.