आॕक्सिजन बेडची सुविधा कमी पडू देणार नाही- अरविंद पाटील निलंगेकर

निलंगा,१२ मे /प्रतिनिधी  :- 

उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल व श्वास कोविड रुग्णालय या ठिकाणी आज रोजी १०० आॕक्सिजन बेडची व्यवस्था असुन लवकरच आणखी १०० आॕक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी आरोग्य विभागाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान सांगितले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता हेच आपले प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना  प्रत्यक्ष भेट देवून रुग्णालयातील विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते चेअरमन दगडू  सोळूंके, तालुका आरोग्य आधिकारी डॉ. श्रीनिवास कदम यांच्या समवेत  निटूर, हलगरा, अंबुलगा बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी करून निटूर, हलगरा, अंबुलगा (बु) येथे प्रत्येकी १० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासंदर्भात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नियोजन करण्यात येईल असे सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था उत्तम असावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे निलंगेकर यांनी सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, बालाजी मोगरगे, उपसरपंच अमृत बसवदे, संजय हलगरकर, कालीदास पाटील, उपसरपंच संगमवेश्वर कारंजे, रोहित पाटील गौरकर, एस.आर.काळे, डॉ आझरोद्दीन ढालाईत, डॉ.अबिदजी शेख, आरोग्य अधिकारी श्री.रोडे, डॉ.श्रीनिवास मोरे, डॉ.प्रतिक्षाताई मोरे व इतर कर्मचारी उपस्थित होते