शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य वापर करावा-जिल्हा न्यायधीश मोहियोद्दीन शेख

आजादी का अमृत महोत्सव

वैजापूर ,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- तालुका विधिसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत वैजापूर तालुक्यात २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Displaying IMG_20211007_204523.jpg

वैजापूर पंचायत समितीच्या स्व.विनायकराव पाटील सभागृहात पार पडलेल्या या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायधीश मोहियोद्दीन शेख हे होते. तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.निचळ,तहसीलदार राहुल गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे,कृषी अधिकारी श्री.आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे,प्रवीण साखरे,सोपान पवार,महेश कदम,,डी.टी.डघळे यांनी विविध कायद्याविषयी माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश शेख यांनी विविध कायद्याविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध करावी, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य वापर करावा.असा सल्ला दिला.प्रास्ताविक प्रवीण साखरे यांनी तर सूत्रसंचालन प्रदीप चंदणे यांनी केले.शिबिरास पंचायत समितीचे कृषी अधिकारी एच.आर.बोयनर,सहाय्यक फौजदार भावे,विठ्ठल जाधव यांच्यासह शेतकरी व कर्मचारी यावेळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.