पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्दोगावर फुलंब्रीत  कार्यशाळा

फुलंब्री,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवार ( 24 सप्टेंबर) पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग या विषयी  कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 
या कार्यशाळेस जिल्हा समन्वयक पवनकुमार काबरा यांनी मार्गदर्शन केले.  मार्गदर्शन करते वेळी त्यांनी योजनेविषयी येणाऱ्या अडचणी , ऑनलाईन अर्ज करणे, बँका संबधित माहिती, प्रोजेक्ट विषयी माहिती सांगितली.   
तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हदगावकर व तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी तालुक्यात असलेल्या अन्न प्रकिये विषियी असलेल्या वेगवेगळ्या संधी विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विठ्ठल गोराडे व आत्माचे सहाय्यक तालुका तत्रज्ञान व्यवस्थापक  जगदीश जाधव यांनी केले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे , सर्व कृषी पर्यवेक्षक ,कृषी सहाय्यक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.