फुलंब्री शहरात पोषण आहार महाभियान उत्सवात साजरा

नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती

फुलंब्री,२४ सप्टेंबर / प्रतिनिधी :- फुलंब्री शहरात पोषण आहार महाअभियान संत सावतामाळी मंदिरात नुकताच उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नंदा गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती सर्जेराव मेटे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्येष्ठ नागरिक देवराव राऊत, नगरपंचायतचे बांधकाम सभापती गणेश राऊत, नगरसेवक अड. आसेफ पटेल, सुमित प्रधान, गजानन नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

एकात्मिक बालविकास प्रकल्पातून कुपोषणातून मुक्तता होण्यासाठी चांगला पोषण आहार बालकांना देणे अनिवार्य आहे. त्यामुळे एकात्म बालविकास प्रकल्पातून विविध उपक्रम तालुक्यातील बालकांसाठी राबवले जातात. त्याच अनुषंगाने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पोषण अभियानानिमित्त पोषण प्रतिज्ञा, पोषण आहार व प्रदर्शन, सामाजिक लेखा परीक्षण इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. पोषण अभियान व आहाराविषयी पर्यवेक्षिका मनीषा कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कुपोषित सामाजिक लेखा परीक्षण याविषयी पर्यवेशिका मंगला शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले आहे.

यावेळी सुनिता शेजवळ, नूरजहाँ पठाण, आशा गढवे, संगीता भालेराव, कांता रघु, जाई वाघ, प्रीती गंगावणे, पल्लवी साळवे, सुनिता पाथ्रे, संध्या काथार, सुरेखा पेहरकर, प्रतिभा झवाघमारे, गजराबाई सुरे, यशोदा रघू, सविता जाधव, मीरा नागरे, आशा गरसुळे, बेबी उबाळे, वर्षा गाढे, मुक्ता सोनवणे, छाया रघु, शशिकला वाघ, जाकिरा शहा, ज्योती खटे, ज्योती महालकर, मीरा नागरे, शाहीन पटेल, शाहीद्रा काजी, आशा उबाळे, वर्षा शिरसाट व त्याचे सर्व मदतनीस यांनी परिश्रम घेतले आहे.