भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 73.82 कोटी मात्रांची व्याप्ती ओलांडली

गेल्या 24 तासात 28,591 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- आज सकाळी  7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात दिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या 72,86,883 मात्रांसह देशाच्या कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती वाढून एकूण 73.82 कोटी (73,82,07,378) मात्रांच्या पुढे गेली आहे. 75,25,766 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.गेल्या 24 तासांत 34,848 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,24,09,345 झाली आहे.परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.51% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 77 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.गेल्या 24 तासात 28,591नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,84,921 असून आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.16% आहे.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,30,125 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 54.18 कोटींहून अधिक (54,18,05,829) चाचण्या घेतल्या आहेत.देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.17% असून गेल्या 79 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.87%असून गेले सलग 13 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 96 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.