कल्याण सिंह जी… एक नेता, ज्यांनी नेहमीच जनकल्याणासाठी कार्य केले आणि संपूर्ण देश कायमच त्यांच्या या कार्याची प्रशंसा करत राहील : पंतप्रधान

नवी दिल्ली,२२ऑगस्ट /प्रतिनिधी :-

आपल्या सर्वांसाठी हा एक दु:खदायक क्षण आहे. कल्याण सिंह जी यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव कल्याण सिंह असे ठेवले होते. त्यांनी  अशा प्रकारे आपले  जीवन व्यतीत केले, की  त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या ठेवलेल्या नावाचे त्यांनी सार्थक केले. ते आयुष्यभर लोकांच्या कल्याणासाठी जगले, त्यांनी लोककल्याणाला आपला जीवन-मंत्र बनविला. आणि त्यांनी आपले जीवन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनसंघ, हे एक  संपूर्ण कुटुंबच आहे, अशा  एका विचारासाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समर्पित केले.

Image

कल्याण सिंह जी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विश्वासाचे स्थान बनले होते. ते योग्य निर्णय घेण्यासाठी एक उत्तम उदाहरण बनले होते आणि ते त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. जेंव्हा जेंव्हा त्यांच्यावर  जबाबदारी आली, मग ती आमदार म्हणून असो, सरकारमधील त्यांचे स्थान असो, वा राज्यपालपदाची जबाबदारी असो, नेहमीच प्रत्येकासाठी प्रेरणास्थान राहिले. जनसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक राहिले.

Image

देशाने एक अमूल्य व्यक्तिमत्व, एक सामर्थ्यशाली नेता गमावला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी, आम्ही त्यांच्या आदर्शांचे पालन करत, त्यांच्याकडून प्रेरणा  घेऊन अधिकाधिक उत्तम कार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करु आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यात आम्ही कोणतीही कमतरता ठेवणार नाही. मी भगवान प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करतो की, प्रभू श्रीरामांनी  कल्याण सिंहजींना त्यांच्या चरणांवर स्थान देण्याची कृपा करावी तसेच हा दुःखद प्रसंग सहन करण्याची शक्ती भगवान राम त्यांच्या परिवाराला देवो.

तसेच मी प्रार्थना करतो की देशातील, प्रत्येक दुःखी व्यक्तीचे, जो इथल्या मूल्यांवर, आदर्शांवर, संस्कृतीवर, आणि इथल्या परंपरेवर विश्वास ठेवतो त्याचे  सांत्वन प्रभू श्रीराम करतील.