दहावीचा निकाल ९९.९५ टक्के,राज्यातील २२ हजार ३८४ शाळांचा १०० टक्के निकाल

११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा
दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

औरंगाबाद ,१६जुलै /प्रतिनिधी :- करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

Maharashtra SSC Result: दहावीचा निकाल जाहीर! 99.95 टक्के विद्यार्थी  उत्तीर्ण, यावर्षीही कोकणची बाजी

राज्यातील २२ हजार ७६७ शाळांमधून १६ लाख ५८ हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर राज्यातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ५ टक्के जास्त विद्यार्थ्यांना यावेळी १०० टक्के गुण मिळाले आहेत. २०२१ च्या दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत

राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे.राज्यातील नऊ विभागांचा ९९.९५ टक्के निकाल लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे.

राज्यातील नऊ विभागांचा निकाल खालीलप्रमाणे-

कोकण विभाग- १०० टक्के

अमरावती विभाग- ९९.९८ टक्के

मुंबई विभाग- ९९.९६ टक्के

पुणे विभाग- ९९.९६ टक्के

नाशिक विभाग- ९९.९६ टक्के

लातूर विभाग- ९९.९६ टक्के

कोल्हापूर विभाग- ९९.९२ टक्के

नागपूर विभाग- ९९.८४ टक्के

कोरोनाकाळात परीक्षा न झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी आल्या . दुपारी 1 वाजता महाराष्ट्र बोर्डाने निकाल जाहीर केला होता.  त्यानंतर 1 वाजता वेबसाइटवर विद्यार्थी निकाल पाहू शकत होेते. मात्र आता वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे सर्वांची निराशा झाली. साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना वेबसाइट क्रॅश झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे  हा निकाल तयार करण्यात आला आहे.  १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार होता. पण  वेबसाइट क्रॅश झल्याने निकाल बघता आला नाही. पण सायंकाळनंतर वेबसाइट पूर्ववत झाल्याने निकाल विद्यार्थ्यांनी बघितल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथमच कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.

११ वीच्या प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थींना देता येणार सीईटी परीक्षा

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केले होते की, “दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य बोर्ड किंवा परीक्षा परिषद विद्यार्थ्यांना सीईटी पोर्टलवर नोंदणी करण्याचा पर्याय देण्यात येईल.” सीईटी परीक्षेच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही.