अभिनयाचे विद्यापीठ दिलीप कुमार

Dilip Kumar Will Be Remembered As A Cinematic Legend, PM Narendra Modi  Leads Tributes

प्रशांत कुलकर्णी/अबुधाबी

१९४३ साली बॉम्बे talkies ची जबाबदारी  मालक हिमांशू राय यांच्या निधनानंतर त्यांची २० वर्षांनी लहान असलेली बायको देविका राणी हिच्यावर आली.अमिया चक्रवर्तींच्या सहाय्याने त्यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाची तयारी चालली होती.एके दिवशी युसुफ खान नावाचा तरुण देविका राणी यांच्यापुढे येऊन उभा राहिला.त्याच्या वडिलांचे क्राफोर्ड मार्केट मध्ये फळ विक्र्त्याचा व्यवसाय होता.पण याला चित्रपटात काम करायचे होते.देविकारानीने एकवार त्याच्याकडे नजर टाकली.आगामी चित्रपटाचा नायकच त्यांच्या डोळ्यापुढे तरळत होता.चांगले चिकणे -चोपडे व्यक्तिमत्व होते .नायक म्हणून शोभला असता.पण नाव? ३५ कोटी हिंदूंच्या देशात नायकाचे हे नाव स्वीकारले जाईल? त्यांनी त्याचे नाव बदलायचे ठरवले आणि मनातल्या मनात  नवीन नाव  पक्के देखील केले .’दिलीप कुमार’!  ज्वार भाटा’ या चित्रपटातून युसुफ खान हा नवे बारसे घेऊन दिलीप कुमार या नावाने ओळखला जाऊ लागला.

Conversations with Dilip Kumar - Rediff.com movies


‘ज्वार भाटा’ फार चालला नाही. नंतर च्याही २-४ चित्रपटाने अपयशच पहिले पण ‘मिलन’ चालला आणि त्यानंतर चा नूरजहान सोबतच ‘जुग्नू’ देखील हिट झाला.खालच्या पट्टीत पण त्याच तीव्रतेने ,शांतपणे संवादफेक करणारा हा नायक प्रेक्षकांना त्यावेळच्या इतर नायकांच्या तुलनेत वेगळा वाटला.संवादात pauses  घेऊन बोलणे,हाताच्या बोटांचा वापर नाक व कपाळावर घासत करणे ,नाहीतर दोन्ही  हात  pant च्या खिशात घालून बोलायचे हि त्याची style एव्हाना लोकांना आवडायला लागली होती.१९४९ चा मेहबूब खान च्या अंदाज मध्ये तो राज कपूर आणि नर्गिस यांच्या बरोबरीने उभा राहिला.त्याकाळात नावाजलेल्या कलाकारांना घेऊन काढलेला हा पहिला प्रेमाचा त्रिकोण असावा.या चित्रपटाला नौशाद यांचे संगीत होते.मजेची गोष्ट म्हणजे पुढे मुकेश हा राजकपूर चा आणि रफी हा दिलीप कुमारचा  आवाज झाला. पण या चित्रपटात नौशाद यांनी दिलीप कुमार साठी मुकेश चा आवाज वापरला होता.हम आज कही दिल खो बैठे,तू कहे अगर  जीवनभर,झूम झूम के नाचो आज गाओ ख़ुशी के गीत रे हि गाणी दिलीप च्या तोंडी शोभून दिसली. त्यानंतर यहुदी (ये मेरा दीवानापन है),मधुमती (सुहान सफर है ,दिल तडप के कह रहा है,) चा अपवाद वगळता मुकेश दिलीप कुमार साठी गायल्याचे फारसे आठवत नाही.

Dilip Kumar's most memorable performances | Filmfare.com

अंदाज नंतर दिदार(अशोक कुमार बरोबर),आन,संगदिल,अमर,उडन  खटोला,इंसानियत (देवानंद बरोबर) या चित्रपटात दिलीप दिसला.दिदार,हलचल मध्ये भग्न ह्रुदयी प्रियकर सादर केल्यावर देवदास ने या सर्वांवर कळस चढवला आणि दिलीप कुमार वर ‘ट्रजेडी किंग’ असा शिक्का बसला. पण आन, उडन खटोला,आझाद,नयादौर,कोहिनूर मध्ये त्याने हलक्या फुलक्या,नर्म विनोदी  भूमिका पण प्रसन्न पणे पेश केल्या होत्या.हृषीकेश मुखर्जी यांच्या’मुसाफिर’ मधे तर सलील चौधरीने त्याला लता  बरोबर  गायला देखील लावले.पुनर्जन्मा वर आधारित बिमल राय च्या मधुमती मधे तो वैजयंती बाला बरोबर चमकला.मग पुढे या जोडीने नया दौर,संघर्ष.गंगा जमुना या सारखे हिट चित्रपट दिले .

Why not a Bharat Ratna for Dilip Kumar? | Deccan Herald

Tragedy  Queen मीना कुमारी आणि Tragedy King  दिलीप कुमार एकत्र आले ते मात्र कोहिनूर ,आझाद या सारख्या हलक्या फुलक्या नर्म विनोदी चित्रपटात. पण खरी जोडी जमली ती मधुबाला बरोबर.१९६० चा मुगले आझम हा त्याच्या कारकिर्दीतला श्रेष्ठ चित्रपट ठरावा.पण तेव्हढाच श्रेष्ठ त्याचा स्वतःचा production  चा भाऊ नसीर खान ला घेऊन काढलेला ‘गंगा जमुना ‘ !…भोजपुरी भाषेतील हा चित्रपट कितपत चालेल अशी शंका व्यक्त होत असतानाच या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले .कलाकाराच्या कारकिर्दीत यश -अपयश हे उनसावली प्रमाणे साथ देत असतात.यशाचा  उच्च  असा ज्याला सुवर्णकाळ( golden  era )म्हणता येईल  असाही काल येऊन जातो .पण सतत यशाला आपल्या जवळ ठेवता येत नाही.नया दौर,मुघले आझम,गंगा जमना च्या अभूतपूर्व यशानंतर दिलीप कुमार चा golden  era सुरु झाला होता.कारकीर्दीच्या सर्वोच्च ठिकाणी तो जाऊन बसला होता.पण यश आणि लक्ष्मी कायमचे कधीच नसतात याचा प्रत्ययही त्याला लगेच आला.१९६४ च्या लीडर पासून त्याच्या कारकिर्दीची घसरण सुरु झाली.मग दिल दिया दर्द दिया,संघर्ष ,आदमी,गोपी, अशी अपयशी मालिकाच सुरु झाली.दिलीप कुमार सारख्या सर्जनशील कलाकाराला ला दिग्दर्शनात इंटरेस्ट निर्माण झाला.हा इंटरेस्ट हस्तक्षेप मानला गेला. ६७ च्या राम और शाम मध्ये त्याने प्रथम डबल रोल केला व लोकांना पण आवडला.पण तो कारकिर्दीची घसरण थांबवू शकला नाही.अनेक वर्ष रखडलेल्या बैराग मध्ये तो ट्रिपल रोल  चमकला.पण लोकांना एव्हाना एका दिलीप कुमार चा कंटाळा आला होता तिथे तीन तीन दिलीप कुमार कोण बघणार? शिवाय राजेश खन्ना नावाचे वादळ आसपास घोंघावत होतं.त्यात भल्या भल्यांचा टिकाव लागला नाही.शोले मधला गब्बर चा रोल व यादो कि बारात मधला धर्मेंद्र चा रोल त्याने नाकारला.त्या आधीही त्याच्याकडे  कैक वर्षापूर्वी गुरुदत्त ;प्यासा’ ची ऑफर घेऊन गेला होता.तो रोल त्याने देवदास टाईप वाटल्याने नाकारला होता. नाइलाजाने गुरुदत्त चेहरयाला रंग फासून प्यासा चा नायक म्हणून उभा राहिला होता.५-६ रील शूटिंग झाल्यावर गुरुदत्त परत एकदा दिलीप कुमार कडे गेला व म्हणाला.’मला अजूनही वाटते कि हा रोल तुमच्या साठीच योग्य आहे.तुम्हीच करा.दिलीप आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.मदर इंडिया तला नर्गिस च्या मुलाचा बिरजू चा रोल त्याने असाच नाकारला होता आणि संगम मधला राजेंद्र कुमारने साकारलेल्या गोपाल ची ऑफर  पण राज कपूर ने प्रथम दिलीप कुमार कडेच  केली होती.

७०-८० च्या दशकात राजेश,अमिताभ युगात बाहेर फेकला गेलेला दिलीप कुमार ८० नंतर चरित्र भूमिकांकडे वळला.परत आपल्या स्टाईल ने क्रांती,शक्ती,मशाल,कर्मा,विधाता,सौदागर यासारख्या चित्रपटात आपली छाप पडून गेला.मशाल मधला आजारी वहिदाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला गाडी थांबवण्यासाठी ‘गाडी रोको भाई’ अशा विनवण्या करणारा दिलीप कुमार कोण विसरेल? ‘इस खून से हम इन्किलाब लिख देंगे,क्रांती लिख देंगे.असा क्रांती तील दिलीप कुमार किंवा शक्ती मध्ये अमिताभ आणि दिलीप कुमार ची शाब्दिक जुगलबंदी हि दोघांच्याही चाहत्यांना हवी हव्हीशी वाटणारी.उण्यापुर्या ७० वर्षाच्या कारकिर्दीत अवघे ८०-८५ चित्रपटात काम केलेला,कलिंग,चाणक्य सारखे भव्य प्रोजेक्ट अर्धवट सोडून दिलेला पण ५० ते ६५ या पंधरा वर्षात आपल्या अभिनयाने  त्याकाळच्या पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेला,अभिनयातले स्वतःचे वेगळेपण ,संवाद फेकीची स्वतःची वेगळी स्टाईल जपलेला,अभिनय सम्राट हि उपाधी सार्थपणे मिरवणारा दिलीप कुमार हा एकमेकाद्वितीयच.!! शास्त्रशुद्ध अभिनयाचे  विद्यापीठच ! त्याने कधी दुसऱ्याची  कॉपी नाही केली पण त्याची कॉपी करून मनोज कुमार,राजेंद्र कुमार यांनी देखील यश मिळवले.पण सोने ते सोनेच .पितळाला कितीही सोन्याचा मुलामा द्या ती चकाकी कधीही येणार नाही.