भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या उपस्थितीत लोह्यात वटवृक्ष लागवड

लोहा,२४जून /प्रतिनिधी :-वट पूर्णिमा निमित्ताने दरवर्षी जि प सदस्या प्रणिता देवरे -चिखलीकर या लोहा कंधार मतदार संघात वट वृक्ष वाटप तसेच त्याचे रोपण करतात यंदा राज्याच्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाखापरे यांच्या उपस्थितीत लोह्यात हा कार्यक्रम घेण्यात आला .लोह्यात वटवृक्ष लागवड करण्यात आली.मागील सहा सात वर्षा पासून हा उपक्रम प्राणिताताई राबवितात याचा प्रत्यक्ष अनुभव उमा याना आला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व वृक्षारोपण काळाची गरज आहे असे मार्गदर्शन केले
     लोहा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या पुढाकाराने वटपौर्णिमे निमित्त “एक वृक्ष एक जीवन”या उपक्रमा अंतर्गत  वृक्षारोपण व महिलांना   वटवृक्षाचे रोपट्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी भाजप महिला मोर्चाच्या  प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या हस्ते  हा सोहळा पार पडला  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यकक्षा  जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे चिखलीकर  होत्या.यावेळी  महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, कोषाध्यक्ष शैलामोळक, प्रदेश कार्यकारणी सदस्य शितल भालके,  जिल्हाध्यक्षा  चित्राताई गोरे . जिल्हा कार्यकारणी सदस्य शोभाबगाडे, पंचायत , नगरसेविका कल्पना  मुकदम , शहराच्या प्रथम महिला नगरसेविका गोदावरी सूर्यवंशी, प स सदस्या  सुरेखा  वाले, नगरसेविका गोदावरी सूर्यवंशी, कल्पना मुकदम, महिला मोर्चा  तालुकाध्यक्षा सविता सातेगावे,  प्रियंका बगाडे ,डॉ.सविता घंटे, मुक्ताबाई  पवार यांची उपस्थिती होती   
    भाजप महिला मोर्चाच्या  प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्राणिताताई यांच्या वटवृक्ष रोपटे वाटप व त्याची रोपण या उपक्रमाचे कौतुक केले  त्यांचे अनेक उपक्रम समाजोपयोगी आहेत असे सांगून उमा म्हणाल्या की,  वटपौर्णिमेच्या निमित्त हा वेगळा आगळावेगळा उपक्रम आहे त्याची आज  आवश्यकता  आहे . कोरोना काळात ऑक्सिजन विकत घ्यावे लागला पण ही रोपटे जेव्हा झाडं होतील तेव्हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतील असा वृक्षाची लागवड व संगोपन गरजेचे आहे वटपौर्णिमा मुळे एक वटवृक्ष जरी जिवंत राहिले तरी भविष्यात ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल असेही ते म्हणाल्या
.  प्रदेश उपाध्यक्षा  प्रणिता देवरे चिखलीकर यांनी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन या विषयी महत्व विशद केले व महिलांचा प्रतिसाद दरवर्षी वाढतो आहे याबद्दल सर्वांचे सहकार्य लाभले असे सांगून आज वृक्षारोपण किती गरजेचे आहे हे सांगितले .आरंभी प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.