औरंगाबाद जिल्ह्यात 2825 कोरोनाबाधित, 158 कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 1549 कोरोनामुक्त, 1118 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1549 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1118 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 69 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2825 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Image may contain: text that says 'CORONA VIRUS UPDATE'

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नारेगाव (1), पवन नगर, टीव्ही सेंटर (2), एस.टी.कॉलनी, एन-दोन (1), गल्ली नं 4, गजानन नगर (4), सुतगिरणी, गारखेडा परिसर (1), नवजीवन कॉलनी, एन-अकरा (1), एन-आठ, सिडको (3), मोतीवाला नगर (3), एन-नऊ सिडको (1), कोतवालपुरा (1), आझाद चौक (1), मंजुरपुरा (1), आसेफिया कॉलनी (1), नूतन कॉलनी (1), एन-सहा सिडको (2), सिटी चौक (1), गुलमंडी (1), कैलास नगर (1), मिल कॉर्नर (1), बजाजनगर (2), अंबिका नगर (5), आंबेडकर नगर (6), हर्सुल परिसर (2), बारी कॉलनी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (1), जयसिंगपुरा (1), छावणी (1), दुधड (4), बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), पळशी (1),मुजीब कॉलनी (1), सोयगाव (1), हर्ष नगर (1) पडेगाव (1), एन सात, सिडको (1), बेगमपुरा (1), वाळूज (1), एन चार सिडको (4), मकसूद कॉलनी (1) तुर्काबाद कुटवाडी (1), भाग्य नगर, बाबा पेट्रोलपंपा जवळ (1), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 28 स्त्री व 41 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. भागातील कोरोनाबाधित आहेत.

आतापर्यंत 1549 जण कोरोनामुक्तमनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1549 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत पाच, खासगीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या एन सहा सिडकोतील 90 वर्षीय स्त्री रुग्णाचा 14 जून रोजी दुपारी तीन वाजता, मंसुरी कॉलनीतील 60 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज दिनांक 15 जून रोजी पहाटे 4.15 वा., पहाटे पाच वाजता रोशन गेट येथील 56 वर्षीय पुरूष, पहाटे सव्वा पाच वाजता शिवशंकर कॉलनीतील 70 वर्षीय स्त्री आणि बायजीपुऱ्यातील 76 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात बारी कॉलनी, रहीम नगरातील 40 वर्षीय स्त्री रूग्णाचा आज सायंकाळी सहा वाजता आणि असेफिया कॉलनीतील 47 वर्षीय पुरूष रुग्णाचा आणि अन्य एका खासगी रुग्णालयात जुना बाजार येथील 64 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे आतापर्यंत घाटीत 116, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 41, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 158 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *