भारतात 81 दिवसांनंतर 60,000 पेक्षा कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात आढळले 58,419 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली,२०जून /प्रतिनिधी :-  भारतात 81 दिवसांनंतर 60,000 पेक्षा कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 58,419 नवे कोरोना रुग्ण आढळले. दैनंदिन नवे कोविड -19 रुग्ण आढळण्याच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सलग 13 व्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहेत.

भारतात सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आज 7,29,243 आहे.

गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 30,776 रुग्णांची निव्वळ घट झाली असून देशात नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 2.44% आहे.

बहुतांश लोक कोविड -19 संसर्गातून बरे होत आहेत, सलग 38 दिवस भारतात दैनंदिन नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत 29 हजारांहून अधिक (29,200) रुग्ण कोरोनातून बरे झाले.

महामारीच्या सुरूवातीपासूनच संक्रमित लोकांपैकी, 2,87,66,009 जण यापूर्वीच कोविड–19 मधून बरे झाले आहेत.आणि गेल्या 24 तासात 87,619 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 96.27%असून हे प्रमाण सतत वाढीचा कल दर्शवत आहेत,

संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,11,446 चाचण्या करण्यात आल्या.भारतात आतापर्यंत एकूण 39.10 कोटी (39,10,19,083) चाचण्या करण्यात आल्या आहेत.देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत , तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्णसंख्येत सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.43% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 3.22% आहे. गेले सलग 13 दिवस हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, आतापर्यंत 37,91,686 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून लसीच्या एकूण 27,66,93,572 मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात लसीच्या एकूण 38,10,554 मात्रा देण्यात आल्या.