कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

नुकसानग्रस्तांच्या वतीनं, त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन, मुख्यमंत्र्यांना यावेळी सादर केलं. फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसून या नुकसान ग्रस्तांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे, त्यांना मदत करण्याबाबत सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही, हे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं, फडणवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *