मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगून शैक्षणिक संस्थांत मिळवले प्रवेश

हिंजेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई/पुणे, दि. २५ मे/प्रतिनिधीः- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील (सीएमओ) अधिकारी असल्याचे दाखवून किमान दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांना फसवून प्रवेश मिळवल्याचे समोर आले आहे.

या फसवणुकीची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी नितीन यु. पानसरे यांनी पुण्यातील हिंजेवाडी पोलिस ठाण्यात दिली असून त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपी हाराहुल राजेंद्र पाळंदे (३१, रा. दर्शनगिरी इमारत, केशवनगर, पिंपरी चिंचवड (जिल्हा पुणे) असला तरी अजून कोणालाही अटक झालेली नाही. सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि इतर शैक्षणिक संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची पुण्यात रविवारी भेट घेतल्यानंतर हा प्रवेशासाठी फसवणूक उघड झाली. “…”

शिष्टमंडळाच्या सदस्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, “मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या विनंतीवरून आम्ही प्रतिष्ठित सिम्बॉयसीस ग्रुप इन्स्टिट्यूशन्समध्ये (एसआयबीएम, पुणे, लवले, हिंजेवाडी आणि बंगळुरूत) चार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.” याचा पुरावा म्हणून या सदस्याने ज्या व्यक्तीने मी मुख्यमंत्री कार्यालयात काम करतो असा दावा करणाऱ्याचे आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रवेश मागणाऱ्याचे मोबाईल स्क्रीनशॉटसही दाखवले.

सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

राहुल पाळंदे हा मी समाज कार्यकर्ता असल्याचा दावा करतो. त्याने त्याच्या सोशल मिडिया प्रोफाईलवर मुख्यमंत्र्यांसोबतचे छायाचित्रही पोस्ट केलेले आहे. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने अंतर्गत चौकशी सुरू केली की, आपल्याकडून, मुख्यमंत्र्यांकडून किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडून प्रवेशासाठी विनंती केली गेली होती का? प्रवेशासाठी ज्या मोबाईल फोनवरून विनंती केली गेली तो मोबाईल नंबर मुख्यमंत्री कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याचा नाही तसेच राहुल पाळंदे हा राज्य सरकारच्या कोणत्याही कार्यालयाशी किंवा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित नाही हेदेखील स्पष्ट झाले.

कठोर कारवाईचे आदेश

घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय़ गंभीरपणे दखल घेत प्रवेशासाठी ही फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यास व्यक्तिशः अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे अधिकृत सूत्रांनी म्हटले. राहुल पाळंदे हा सामान्य नागरिकांना तसेच पुण्यातील महत्वाच्या शैक्षणिक संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात मी खूप महत्वाचा अधिकारी असल्याचे सांगत होता हे आणखी तपशिलांतून उघड झाले आहे. सिम्बॉयसीस ग्रुप आणि इतर संस्थामध्ये हवे असलेला प्रवेश प्रामुख्याने व्यवस्थापन कोट्यातून मिळवून देण्यासाठी पाळंदे हा पीडितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळायचा. पाळंदे याने ट्रु कॉलरसह वेगवेगळ्या सोशल मिडिया नेटवर्क्सवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. त्याच्या व्हॉटसअपच्या डीपीवर सीएमओ- गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा लोगोही होता. त्यावर एकनाथभाई शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय अशी ओळखही करून दिली होती. लोकांना आमीष दाखवून फसवण्यासाठी त्याने केलेल्या उपायांत बनावट इमेल अकाऊंट [email protected]‘ आणि एवढेच काय मंत्रालयाचे गुगल लोकेशनही वापरले.

पाळंदेचे दावे बनावट

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या तक्रारीत स्पष्टपणे असे म्हटले आहे की, “राहुल पाळंदे हा ना सरकारी अधिकारी आहे ना राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नोकर आहे ना सरकारी अधिकारी.” वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्याने जे काही सांगितले ते सगळे लोकांना फसवण्यासाठी, शैक्षणिक संस्थांवर दबाब आणण्यासाठी. त्याने केले दावे हे सगळे बनावट आहे, असे तक्रारीत म्हटले.

पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, एकटा राहुल पाळंदेच नव्हे तर इतर काही लोकदेखील पुणे शहरात अशीच कामे करण्यासाठी टोळी बनले आहेत. पाळंदे हा सत्ताधारी शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्याचा जवळचा समजला जातो.

पैसे उकळणारी टोळी

ही टोळी प्रवेश मिळवून देण्यासाठी आठ ते २५ लाख रूपये घेते व त्यासाठी मुख्यमंत्र्याचे किंवा पक्षाच्या अध्यक्षांचे किंवा मंत्र्याचे किंवा सचिवांची नावे घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये दहशत निर्माण केली आहे. प्रवेशाचा वर्ग पाहून या पैशांमध्ये बदल होतात. प्रवेशासाठी हवे ते उपाय केले जातात. प्रवेश नाकारला तर धमक्या दिल्या जातात. पोलिसांनी या कारवायांचा कठोरपणे निःपात केला पाहिजे,” असे शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हटले.

या घडामोडींना मुख्यमंत्री कार्यालयाने दुजोरा दिला. वारंवार प्रयत्न करूनही सिम्बॉयसीस ग्रुप आणि पोलिस विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.