भारतात 54 दिवसातल्या सर्वात कमी 1.27 लाख दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात 157 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

नवी दिल्‍ली, ,१ जून /प्रतिनिधी:- कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 55 हजार 287 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 2 हजार 795  रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे. 

देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,81,75,044 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,31,895  कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 18,95,520  इतकी आहे. भारतात आतापर्यंत 21,60,46,638 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 

कोविड-19 संसर्गाविरुद्धच्या लढाईत kendr सरकार अग्रभागी राहिले असून “संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या या लढ्यातील प्रयत्नांना संपूर्ण पाठबळ पुरवीत आहे. याच प्रयत्नांची पुढची पायरी म्हणून, या पूर्वीच केंद्र सरकारकडून ‘प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज’ चा विस्तार वाढवून त्याअंतर्गत कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले विमा संरक्षण 24 एप्रिल 2021 पासून एका वर्षासाठी वाढविण्यात आले आहे.  

कोविड -19 ची ताजी माहिती

भारतात 54 दिवसातल्या सर्वात कमी 1.27 लाख दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद; 

नवे रुग्ण आढळण्याचा घटता कल कायम. 

भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 18,95,520 पोहचली. 43 दिवसांनंतर रुग्णसंख्या 20 लाखाखाली.

गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,30,572 ची घट. 

आतापर्यंत देशभरात एकूण 2,59,47,629 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 2,55,287 रुग्ण झाले बरे. 

सलग 19 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक.

रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ कायम, आज 92.09%.

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या  8.64%.

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 6.62%वर घसरला, सलग 8 व्या दिवशी 10% पेक्षा कमी.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ- आतापर्यंत एकूण 34.67कोटी चाचण्या झाल्या.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 21.6 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.  

औरंगाबाद जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 408 जणांना (मनपा 136, ग्रामीण 272) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 136463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142889 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3214 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (67) सातारा परिसर 2, बीड बायपास 2, गारखेडा 1, शिवाजी नगर 2, कांचनवाडी 2, अजब नगर 1, मिटमिटा 1, पेठे नगर 1, एन-12 येथे 1, एन-5 येथे 2, हर्सूल 3, संत ज्ञानेश्वर नगर 1, आंबेडकर नगर 1, चेतना नगर 2, सारा वैभव 1, सुरेवाडी 1, विश्रांती नगर 1, संभाजी कॉलनी 1, एन-4 येथे 1, पुंडलिक नगर 1, इंदिरा नगर 1, माऊली नगर 1, सातारा पोलीस स्टेशन मागे 1, जवाहर कॉलनी 1, निसर्ग कॉलनी भीमनगर 2, तथागत चौक बन्सीलाल नगर 2, द्वारका नगर पडेगाव 1, गुलमंडी 1, संजय नगर 2, मेल्ट्रॉन एमआयडीसी 2, अन्य 25

ग्रामीण (90) वाळूज एमआयडीसी 1, नावडी ता.कन्नड 1, रांजणगाव 1, भराडी ता.सिल्लोड 2, फुलंब्री 1, लासूर स्टेशन ता.गंगापूर 1, हट्टी ता.सिल्लोड 1, अन्य 82

मृत्यू (07)

घाटी (05)1. पुरूष/52/सावरगाव, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.2. पुरूष/72/राजनगर, पैठण, जि.औरंगाबाद.3. पुरूष/38/मुकुंदवाडी, औरंगाबाद.4. पुरूष/30/गोलटगाव शेकटा, ता. जि.औरंगाबाद.5. स्त्री/70/शिरोड खुर्द, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (02 ) 1. पुरूष/82/एस.टी.कॉलनी, औरंगाबाद.2. पुरूष/68/औरंगाबाद.