शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

परभणी,२९मे /प्रतिनिधी :- शहीद जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर आज शनिवार रोजी रात्री 10:15 वाजता परभणी जिल्ह्यातील महागाव ता.पूर्णा येथे साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

May be an image of one or more people and people standing

शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यसंस्कार प्रसंगी प्रारंभी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी शहीद जिजाभाऊ यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. खासदार संजय जाधव, नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे, तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, सैनिक कल्याण कार्यालयाचे श्री. पाटील तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी शोकाकूल वातावरणात पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.

May be an image of one or more people, people standing and outdoors

शहीद जवान जिजाभाऊ यांच्या कुटुंबियांनी धार्मिक रितीनूसार अंत्यविधी पूर्ण केला. तत्पुर्वी पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच हवाई दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

May be an image of one or more people, people standing and outdoors

यावेळी बँड पथकांने शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद जिजाभाऊचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हवाई दलात पठाणकोट येथे तैनात असलेले भारतीय जवान जिजाभाऊ मोहिते शहीद झाले होते. दि.29 मे रोजी रात्री 9 वाजता पार्थिव महागाव या गावी आणण्यात आले. तेथून शोकाकूल वातावरणात मिरवणूकीने गावकऱ्यांनी महागाव येथे पार्थिव आणले त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले.