सकारात्मक बातमी :’आपलं घर’ला शिवसेना आमदार चौगुले यांची मदत

एक महिन्याचे धान्य  दिले,’आपलं घर ‘ ला मदतीची गरज 

उमरगा ,२९ मे / नारायण गोस्वामी
मी स्वतः वस्तीगृहात राहून शिक्षण घेतले असून ,मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता अभ्यास करा.  यशस्वी झाल्यानंतर ‘आपलं घर ‘ या आपल्या कुटुंबास  विसरू नका असे आवाहन करत आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड  यांनी येथील आपलं घर निवासी बालगृहातील  विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे एक महिन्याचे रेशन  वाटप करत येथील मुलांशी संवाद साधला. 

May be an image of 1 person and standing


यावेळी त्यांनी आपलं घर बालगृह  परिसरातील विविध वास्तूंची पाहणी केली. यावेळी युवा सेनेचे नेते किरण गायकवाड यांनी याप्रसंगी कोरोना काळात मुलांना धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील मुलांची विशेष काळजी घेण्याची सुचना करताना, भविष्यात काही मदत लागल्यास कळवा मी स्वतः आपल्यास भेटून मदत करेन असे आश्वासन दिले. 

May be an image of one or more people, people standing, people sitting and outdoors


यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते व आपलं घरचे विश्वस्त पन्नलाल सुराणा यांनी सन १९९३ नंतर अस्तित्वात आलेल्या आपलं घर या बालगृहाची वाटचाल, जडणघडण याबद्दल माहिती देताना आजतागायत मदत करत असणाऱ्या सर्व व्यक्ती, संघटना व संस्थाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच वस्तीगृहास शासनाकडून तब्बल पाच वर्षाचे अनुदान मिळाले नसल्याचे सांगून त्याबद्दल नाराजी व्यक्त करत हे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी केली.यावर आमदार चौगुले यांनी तात्काळ पाठपुरावा करु असे सांगितले .  

May be an image of one or more people and people standing


 बालगृह परिसरातील शेतात खासदार रवींद्र गायकवाड यांच्या खासदार निधीतून सौर पंप बसवण्यात आले होते याबद्दल सांगताना या शेतातुन आम्ही भाजीपाला पिकवतो व यामुळे आम्हाला बाहेरून भाजीपाला आणावा लागत नसल्याचे सांगितले. विशेष बाब म्हणजे बालगृहाचे रखडलेले अनुदान प्रकरणी पन्नालाल सुराणा यांनी यापूर्वी बालगृहातील मुलासोबत उपोषण  व धरणे आंदोलनही केले आहे.
यावेळी पन्नालल सुराणा, आ. ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड , उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, उप तालुका प्रमुख जगन पाटील ,युवा सेनेचे विभाग प्रमुख शरद पवार, योगेश तपसाळे,अशोक पवार, गुंडू पवार,विलास वकील, शिवदे पाटील, सरदारसिंग ठाकूर, मयुर हुलगे, सोमनाथ म्हेञे, नेताजी महाबोले आपलं घर येथील कर्मचारी व  मुलं, मुली उपस्थित होते.