घाटीतील कथित कंञाटी कामगारांना सेवेत सामावून घ्या – आयटकची लोकप्रतिनिधींकडे मागणी

औरंगाबाद,२३मे /प्रतिनिधी :-

घाटी  रुग्णालयातील वर्षानुवर्षे काम करणारे   कोव्हिड योद्धे कथित कंत्राटी कामगारांना शासकीय सेवा भरती प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी औरंगाबादच्या आमदारांना महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न  आयटकचे तर्फे निवेदन देण्यात येत आहेत. आमदार संजय शिरसाठ व आमदार सतिश चव्हाण यांना निवेदन आले.यापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनाही निवेदन देण्यात आले आहे. 

सद्यस्थितीत कोव्हीड च्या दुसऱ्या लाटेत औरंगाबादच्या नागरिकांकरीता देवदुत बनुन काम करणाऱ्या घाटी रुग्णालयातील कथित कंत्राटी कामगारांना 242/- रुपये रोजाच्या अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते, त्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी औरंगाबादच्या लोक प्रतिनिधिना  आयटक तर्फे निवेदन देऊन कायमस्वरूपी करण्याची मागणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. कथित कंत्राटी कामगार घाटी तील कोव्हिड योद्धे यांना‌ आजपर्यंत कोव्हीड संसर्गात काम करुनही कायमस्वरूपी सेवेतील कोणतेही लाभ दिले जात नाहीत. अगदी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांइतकेच कथित कंत्राटी कामगारांचे काम माञ लक्षणीय आहे,

केवळ औरंगाबाद शहराचेच नव्हे तर आसपासच्या आठ जिल्ह्यांत त्यांच्या कामामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळत आहे. अक्षरशः रुग्णांचे डायपर बदलण्याचे कामही या कामगारांना करावे लागते. पी पी ई कीट , मास्क ‘, सॅनीटायझर ई सुरक्षा नसतांना या कामगारांनी रुग्नसेवा केली आहे. त्यांनी नोकरीत कायम करा ‘,पगार वाढ करा , पगार वेळेवर द्या या मागणीसाठी 148 साखळी उपोषण केले आहे, मुख्यमंञी, पालक मंञी, वैद्यकीय शिक्षण मंञी यांना भेटून वेळोवेळी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱी  सुनिल चव्हाण यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. या कामगारांचे आरोग्य सांभाळत व‌ घर चालवण्यासाठी आवश्यक ती पावले टाकत महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक वारंवार लढा देत आहे, याच लढ्याचा एक भाग म्हणून औरंगाबादच्या संपुर्ण लोकप्रतिनिधीं ना निवेदन देऊन कायमस्वरूपी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सदर कामगार कर्मचारी व घाटीत उपचार घेणारे रुग्ण हे आपल्याच मतदार संघातील असल्याने  आपण या मागणीत लक्ष घालावे असे निवेदनात म्हटले आहे. 

निवेदन आमदार संजय सिरसाठ,आमदार सतीश  चव्हाण यांना देण्यात आले. यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांनाही निवेदन देण्यात आले होते.  सर्वच लोक प्रतिनिधिना महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी संघटनेचे महासचिव अ‍ॅड अभय टाकसाळ, विकास गायकवाड, गजानन खंदारे,महेंद्र मिसाळ, आनंद सुरडकर, अमोल सरोदे,भालचंद्र चौधरी इ उपस्थित होते.