रेमडीसिवर इंजेक्शनचा काळाबाजार , २ आरोपींना अटक

Image

औरंगाबाद ,४ मे /प्रतिनिधी 

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडीसिवर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या २ आरोपींना औरंगाबाद शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून ६ इंजेक्शन जप्त केली आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.