पीपीई किट घालून चोरट्याची हाथसफाई ,जालन्यातील घटना
जालना:करोनाग्रस्त रूग्णावर उपचार करण्यासाठी डाॅक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वापरतात त्या किट घालून चोरट्यांनी जालन्यातील बाजारात असलेल्या एका दुकानाचा गल्ला साफ केला आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे करोना किट घालून चोरी करताना कॅमेर्यात कैद झालेले दिसत आहेत.नवीन जालन्यातील शहर वाहतूक पोलीस चौकीपासून जवळ च्या अंतरावर असलेल्या सरोजिनी देवी रोडवरील एकता काॅम्लेक्स मध्ये सोमवारी रात्री दोन चोरटे घुसले

काॅम्लेक्सच्या लाॅबीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्यांच्या सगळ्या हालचाली टिपल्या आहेत.यात दोन चोर दिसत आहेत.याठिकाणी विशाल एन्टरप्रायझेस या अल्ट्राटेक सिमेंट च्या डिलरच्या दुकानाचे शटर तोडून तिजोरीतील रोख 43,000 रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

चोरटे करोना किट मध्ये दिसत असले तरी ते करोना सुट मध्ये नाहीत ट्रॅक् सुट मध्ये आहेत . चेहरा पूर्ण मास्क ने झाकलेला आहे..-संजय देशमुख. पोलिस निरीक्षक, सदर बाजार.
नवीन जालन्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या एक ग्राहक सेवा केन्द्र चोरट्यांनी रात्री फोडले आहे याठिकाणी तिजोरी तोडून आत असलेली 21,620 रोख रक्कम लंपास करून ते ड्राव्हर शेजारच्या नाल्यात चोरट्यांनी फेकून दिले आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे