केवळ 92 दिवसांत 12 कोटींचे लसीकरण करत भारत ठरला जगातील सर्वात वेगवान देश

गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, या राज्यांत प्रत्येकी 1कोटीपेक्षा अधिक लसीकरण

नवी दिल्ली,१८ एप्रिल / प्रतिनिधी 

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या भारतातील लसीकरणाने  कोविड -19 च्या लसींच्या जवळपास 12 कोटींच्या एकूण मात्रा देण्याचे काम पूर्ण केले आहे.  

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण  18,15,325 सत्रांद्वारे  12,26,22,590  लसींच्या मात्रा देण्यात आल्या.यापैकी 91,28,146 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची पहिली मात्रा घेतली,   57,08,223  आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची दुसरी मात्रा घेतली, 1,12,33,415 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW पहिली मात्रा) 55,10,238 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW लसीची दुसरी मात्रा), वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या  4,55,94,522 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा,तर 38,91,294 लाभार्थ्यांना दुसरी  मात्रा , तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 4,04,74,993  लाभार्थ्यांना (पहिली मात्रा)  तर 10 ,81,759 लाभार्थ्यांना (दुसरी मात्रा) अशा एकूण लसींच्या मात्रा देण्यात आल्या .

देशभरात आतापर्यंत दिलेल्या लसींच्या मात्रांपैकी  59.5% लसींच्या मात्रा आठ राज्यांत दिल्या गेल्या आहेत.गुजरात(1,03,37,448), महाराष्ट्र(1,21,39,453),राजस्थान (1,06,98,771) आणि  उत्तरप्रदेश (1,07,12,739) या चार राज्यांत प्रत्येकी  एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. गुजरात राज्यात एक कोटी लोकांचे लसीकरण दिनांक 16 एप्रिल रोजी पूर्ण झाले तर इतर राज्यांत ही संख्या दिनांक 14 एप्रिल रोजी पूर्ण झाली.भारताने केवळ 92 दिवसांत 12 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आणि भारत हा सर्वात वेगवान देश ठरला.त्याखालोखाल अमेरिका (यू एस) 97 दिवस आणि चीनमध्ये (108 दिवसांत) एवढे लसीकरण झाले.

गेल्या 24  तासांत  एकूण 26 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.काल (दिनांक  17 एप्रिल 2021) या लसीकरणाच्या 92- व्या दिवशी 26,84,956 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या. त्यात 39,998 सत्रांतून  20,22,599 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा  देण्यात आली, तर 6,62,357  लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतातील  दैनंदिन  नवीन रुग्णसंख्येत  भर पडत आहे.गेल्या 24 तासांत 2,61,500 नव्या रुग्णांची नोंद झाली.महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थान या दहा राज्यांत 78.56% नव्या रूग्णांची नोंद झाली  आहे.महाराष्ट्रात  दैनंदिन बाधित रुग्णांत,  सर्वाधिक 67,123 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 27,334 तर दिल्लीत 24,375 नव्या रूग्णांची नोंद झाली. गेल्या 12 दिवसांत दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 8.00% यावरून 16.69% इतका म्हणजे दुप्पट वाढला आहे.गेल्या एका महिन्यात साप्ताहिक राष्ट्रीय पॉझिटिव्हीटी दर 3.05% वरून 13.54% वर पोचला आहे. या राज्यांपैकी छत्तीसगडमध्ये हा दर सर्वात जास्त म्हणजे 30.38%वर पोहोचला आहे.

भारतातील सक्रीय बाधित रूग्णसंख्या आता 18,01,316 वर पोचली आहे. देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी 12.18% रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 1,21,576  सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली.

देशभरातील एकूण बाधित रुग्णांपैकी 65.02% सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड,उत्तरप्रदेश, कर्नाटक, आणि केरळ या पाच  राज्यांत आहेत.देशातील एकूण सक्रीय  रुग्णांपैकी 38.09% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहे.भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 1,28,09,643 इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 86.62% आहे.गेल्या 24 तासांत 1,38,423 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.गेल्या 24 तासांत 1,501 मृत्यूंची नोंद झाली.मृत्यु झालेल्यांपैकी एकूण  82.94 % मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन  (419) मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल दिल्लीमध्ये दैनंदिन 167 मृत्यूंची नोंद झाली