पतीचा कोरोनामुळे मृत्यू; पत्नीची मुलांसह आत्महत्या

दोन मुली पोरक्या,लोह्यातील हृदयद्रावक घटना 

लोहा,१५ एप्रिल /प्रतिनिधी 

लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या मागील भागात भटक्यांची पालवस्ती आहे . पालामध्ये राहणाऱ्या इसमाला करोनाची बाधा झाली त्याचा लोह्याच्या कोविड  रुग्णालयात मृत्यू झाला हे  कळतात पत्नीने आपल्या दोन मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह लगतच्या सुनेगाव  तलावात उडी घेऊन आत्महत्या केली ही  घटना शहरात बुधवारी   पहाटे घडली. 

Displaying IMG-20210415-WA0017.jpg


    लोहा शहरातील गंगाखेड रोड वरील बालाजी मंदिर भागात भटक्या जमातीची पाल वस्ती आहे.वेगवेगळ्या भागातील हे भटके सुया-फुगे,  चाळण्या, जाते असे गृह उपयोगी वस्तूंची विक्री करतात तर काही जमाती भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असतात.याच वस्तीत  निझमबाद तेलंगणा राज्यातील हनुमंत शंकर गदम हे मसणजोगी  कुटुंबासह गेल्या काही महिन्यांपूर्वी उदरनिर्वाह साठी आला होता .गेल्या काही दिवसा पूर्वी हा हनुमंत कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यावर  कोरोना रुग्णालयात  उपचार सुरू होते .उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला . झाला ही बातमी पत्नी पद्मा  हिला कळली.  तीन वर्षाच्या मुलासह महिलेने सुनेगाव येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली.  ही हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे  .पद्मा हनुमंत गदम (वय३५) लल्ली (वय०३) अशी मृत मायलेकराचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसर  हळहळ व्यक्त केली जात आहे.

Displaying IMG-20210415-WA0016.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्माने नवऱ्याच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालणार कसा याचिंतेने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी चिन्नना दुर्गना गदम  (३९) रा. संतोष नगर निजामबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक भागवत जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक करहे हे पुढील तपास करीत आहेत
    मसणजोगी समाजातील शंकर गदम (40) तेलंगणा राज्यातील निझमबाद जिल्ह्यातील राहणार पण लोह्याच्या पाल वस्तीत आला होता  मजूरी  पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत होता.कोरोना झाला तो गेला आणि त्याची पत्नी एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट व्हायला गेली पण सकाळी ऍडमिट होण्यापूर्वीच तिनेआपल्या तीन वर्षीय लल्ली सोबत तलावात जीवन यात्रा संपविली
 दोन लेकरं  उघड्यावर…!

पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्याने पत्नीने दोन मुलींना घरी ठेवून मुलासह तलावात उडी घेऊन आपला जीव गमावला. दोन लहान मुली आता आई-वडीलांविना पोरक्या झाल्या आहेत तिचा मामा याने त्या दिनही लेकरांना घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले  

  भटक्यांना कधी मिळणार पॅकेज-? प्रा. डॉ बालाघाटे

राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे..राज्य सरकार वेगवेगळ्या घटकांना लॉक डाऊन काळात पॅकेज देत आहे .पण ज्याच्या पिढ्यानपिढ्या भाकरीचा अर्ध चंद्र शोधण्यात गेला आणि जातो आहे .त्यांचे जगणेच डाऊन आहे असा भटक्यांना कधी मिळणार पॅकेज .लोह्यातील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.पती कोरोनाने गेला .आणि त्याच्या दुःखात पत्नी व तीन वर्षांचा लेकरू घेऊन आत्महत्या करते ही घटना या पुरोगामी राज्यात चिंताजनक आहे. हजारो भटक्यांचे जगणे कोरोना मुळे असह्य झाले आहे.त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांना मदत करावी तसेच जेथे जेथे या पालवस्तीत आहेत तेथे तेथे  जाऊन सर्वांची कोरोना टेस्ट करावी व पॉझिटिव्ह असेल तर त्यांच्यावर तातडीने वैदयकीय  उपचार करावेत.त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे  अशी मागणी राष्ट्रीय भटक्या विमुक्त महासंघाचे अध्यक्ष प्रा डॉ संजय बालाघाटे यांनी केली आहे