नांदेडमध्ये 138 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

नांदेड दि. 18 :- मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 84 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 138 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 92 बाधित आले.

आजच्या एकुण 802 अहवालापैकी 627 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 4 हजार 325 एवढी झाली असून यातील 2 हजार 561 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 580 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 182 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

सोमवार, 17 ऑगस्ट रोजी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्य झाला.सोमवार, 18 ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथील 68 वर्षाचा एक पुरुष , नांदेड तालुक्यातील सुगाव खुर्द येथील 65 वर्षाचा एक पुरुष , नायगाव तालुक्यातील कहाळा येथील 65 एक पुरुषाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 153 एवढी झाली आहे.आज बरे झालेल्या 84 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 46 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे 92 बाधित आढळले.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 627,घेतलेले स्वॅब- 30 हजार 566,निगेटिव्ह स्वॅब- 24 हजार 563,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 138,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 325,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,एकूण मृत्यू संख्या- 153,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 561,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 580,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 104, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 182.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *