स्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या महिलांच्या पाठीशी इनर व्हिल क्लब-शारदा अंतुरे मिरजकर

चाकूर : कोव्हिड मुळे जगभरात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीच्या काळात ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनत आहेत ही अतिशय चांगली बाब आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या महिलांच्या पाठीशी इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर आहे. असे प्रतिपादन क्लब च्या सचिव शारदा अंतुरे – मिरजकर यांनी हाळी खुर्द येथे नूतन बचत गटाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या रुद्र सुपर शॉपी च्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. 

     

रुद्र सुपर शॉपी चे उद्धघाटन ओंकारेश्वर गॅस एजन्सी च्या संचालिका तथा इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ.अंजली स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुकिया पटेल होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून इनर व्हिल क्लब च्या सचिव शारदा मिरजकर, कमलबाई जनगावे, मोनिका गलांडे, समुदाय संसाधन व्यक्ती अफसना शेख, सना शेख उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील महिलांनी लघु उद्योगाकडे वळावे. संघटन, चिकाटी, जिद्ध, कष्ट व बाजारातील मागणी – पुरवठा याच्या आधारावर ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उन्नती साधता येते. त्यामुळे बाजारात ज्या वस्तुंना मागणी आहे असाच व्यवसाय महिलांनी करावा असे आवाहन डॉ.अंजली स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुपर शॉपी च्या संचालिका सुप्रिया सातापुरे यांनी केले.