प्रकाश भाऊ कौडगे यांचे निधन,अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जीवन  घडविणाऱ्या  नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला

खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली 

नांदेड ,१५ एप्रिल /प्रतिनिधी नांदेड जिल्हाचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश भाऊ कौडगे म्हणजे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वतःचे राजकीय जीवन  घडवणारे नेतृत्व होते.नांदेड जिल्हात शिवसेनेला वैभव निर्माण करण्यात सिंहाचा वाटा प्रकाश भाऊचा होता आशी भावनीक प्रतिक्रिया नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांनी  व्यक्त केली.


नांदेड जिल्हात 1990 ते 2020   या 30 वर्षामध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त काळ शिवसेना जिल्हाप्रमुख. व काही दिवस संहसपर्कप्रमुख.म्हणून संपूर्ण जवाबदारीने शिवसेनेचे बांधणी  केली.मला आठवते की  प्रकाशभाऊ कुठल्याही आंदोलनाला घाबरत नव्हते.  बिनधास्त पोलिस.व प्रशासन,राजकीय लोकांच्या विरोधात ठामपणे बोलायचे.त्यानी अनेक ग्रामीण भागातील कार्यकर्तेना मोठे केले.राजकीय व सामाजिक धार्मिक कामात ते नेहमी आग्रहाने पुढे यायचे.मलाही प्रकाशभाऊ सोबत काम करण्याचा चांगला अनुभव आला आहे.नांदेड येथील जगतज्योती महत्मा बसवेश्वर पुतळा बसवण्यासाठी प्रःथमता जागा उपल्बध करण्यासाठी जिल्हाप्रशासन व महानगरपालीका समोर खुप मोठ्या प्रमाणात विरशैव लिंगायत समाज एकत्र करुन महत्त्वाचा लढा दिला.गदी साधी राहाणीमान व सामान्यपणे जीवन जगणारे प्रकाशभाऊंना आम्ही कधीही विसरु शकत नाहीत.


राजकीय मतभेद कधीही असु शकतात पण प्रकाशभाऊनी कधीही संबंधात राजकारण येऊ दिले नाही.कुठल्याही प्रकारचे कुटुंबात राजकीय पाठबळं नसताना केवळ शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबाचा कडवट शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरु करुन गल्ली ते मुंबई पर्यत च्या सर्व राजकीय लोकासोबत संबध निर्माण करणे व टिकवणे हि बाब साधारण नाही.आज प्रकाशभाऊ यानी मनसेचे जिल्हाअध्यक्ष म्हणून पुन्हा एक महत्त्वाचे पद मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी दिले होते. .प्रकाश भाऊ कौडगे याच्या निधनाने  कौडगे कुटुंबाच्या   दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मी  कौडगे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.प्रकाश भाऊना भावपुर्ण श्रद्धांजली.