स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीड लाखांची  पुस्तके भेट

उमरगा ,१५एप्रिल /प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या जयंती  दिनाच्या निमित्ताने  सामाजिक बाधिलकी उपक्रमा अंतर्गत, युगप्रवर्तक बहुउद्धेशिय सामाजिक फौंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने, जिल्हातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख 33 हजार रुपयाची विविध पुस्तके भेट देण्यात आली.
शहरातील नगर पालिके समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्या समोर हा उपक्रम घेण्यात आला.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाच दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने सामाजिक निधी  निर्माण करण्यात आला असून, प्रत्येक शिक्षकाने  महिन्याला शभर रुपये जमा करून, सदर निधीचा  गरीब विद्यार्थी यांच्या पुस्तकासाठी खर्च करण्यात येत आहे. जे-जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्याना  पुस्तका आभावी माझे मिरीट गेले असे म्हणण्याची वेळ येऊ नये, म्हणून चालू घडामोडीचीं माहिती असलेले पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आले . भाविष्यात उस्मानाबाद येथे निवडक विध्यार्थ्यांसाठी  राहण्याची, भोजनाची, वं स्पर्धा परीक्षेच्या क्लास चीं व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सतीश ढोणे यांनी दिली.उमरगा तालुक्यातील तरुण विद्यार्थ्यांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, ऍंड हिराजी पांढरे, मुख्याध्यापक नागनाथ कांबळे, तानाजी कांबळे, बालाजी गायकवाड, भगवान गायकवाड, ऍड म्हलारी बनसोडे,अविनाश भालेराव, संतोष सुरवसे, विनोद डावरे, उमेश कांबळे, सतीश ढोणे आदीच्या हस्ते   पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
ही पुस्तके वाटप करण्यात आली.
संपूर्ण पर्यावर,सुगम मराठी व्याकरण वं लेखन, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक वं व्यक्ती विशेष, विज्ञान तत्रज्ञान आणि विकास, भारतीय राज्य व्यवस्था, मानव ससाधन विकास आणि मानवधिकार, संपूर्ण इंग्रजी व्याकरण, भारताची राज्य घटना आणि प्रशासन, पर्यावरण आणि परिस्थितीकी, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित वं बुद्धिमत्ता, तलाठी भरती, चालू घडामोडी डायरी, महाराष्ट्राचा भूगोल, बुद्धिमत्ता, भूगोल पर्यावरण, आदी पुस्तके वाटप करण्यात आली.