ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव यशवंतराव नाईक यांचे निधन

निलंगा,१५ एप्रिल /प्रतिनिधी  

निलंगा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक  माधवराव यशवंतराव नाईक यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९८ वर्षी  मुंबई येथे दुःखद निधन  झाले.त्यांच्यावर आज मुंबईतीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात विजय ,हेमंत आणि डॉ.अतुल अशी तीन  मुले, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माधवराव नाईक हे स्वांंतत्र्यपुर्वकाळातील उस्मानाबाद जिल्हातील पहिले एम.ए.झालेले होते. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगीरी बजावली होती . भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडुन हैद्राबादमुक्ती संग्रामासाठी सशस्त्र मदत मिळविण्यात ह्यांचा मोठा वाटा होता. आयुष्यभर त्यांनी स्वताला समाजकार्यात वाहुन घेतले होते. त्यांनी स्वताच्या वडीलांचे नावे यशवंत सेवाभावी व्यसनमुक्ती केंद्राव्दारे  अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. अत्यंत धडाडीचे स्वातञसेनानी म्हणुन त्यांचा  लातुर जिल्हात तसेच   महाराट्रात नावलौकिक  होता. खुप लोकसंग्रह त्यांनी जमा केला होता. अतिशय मनमिळावु व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते.  त्यांच्या निधनाबद्दल लातुर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात तीन  मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.