अर्थ मंत्रालयाकडून राज्यांना आर्थिक वर्ष 2020-21 मधील अतिरिक्त निधी हस्तांतरणापोटी 45,000 कोटी रुपये जारी

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 मधील अतिरिक्त निधी हस्तांतरणापोटी राज्यांना 45,000 कोटी रुपये दिले आहेत. 2020-21 च्या सुधारित अंदाजापेक्षा हा निधी 8.2 टक्कयांनी जास्त आहे. 2020-21 च्या सुधारित अंदाजांनुसार कर आणि शुल्कापोटी मिळणाऱ्या निधीचा हिस्सा म्हणून 5,49,959 कोटी रुपये हा 41 टक्के निधी देण्यात येणार होता. मात्र 2020-21 मधील संकलित झालेल्या निधीमधील देय असलेल्या हिश्श्याच्या सुरुवातीच्या अंदाजांनुसार वित्त मंत्रालयाने 5,94,496 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत झालेल्या महसुल संकलनातील वाढीव वाटा देण्यासाठी आणि वास्तविक वित्तीय संघवादाच्या भावनेतून सरकारने हा निधी राज्यांना दिला आहे. 45,000 कोटी रुपयांचा हा अतिरिक्त निधी 14,500 आणि 30,500 कोटी रुपयांच्या दोन हप्त्यात देण्यात आला. 14,500 कोटी रुपयांचा निधी 26 मार्च 2021 रोजी 14 वा नियमित हप्ता म्हणून देण्यात आला. तर 31 मार्च 2021 रोजी 30,500 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्यांना देण्यात आला.

Sl. NoStateRE 2020-21Additional over RE 2020-21Overall releases in FY 2020-21
1Andhra Pradesh22,6111,85024,461
2Arunachal Pradesh9,68179210,473
3Assam17,2201,40918,629
4Bihar55,3344,52759,861
5Chhattisgarh18,7991,53820,338
6Goa2,1231742,296
7Gujarat18,6891,52920,219
8Haryana5,9514876,438
9Himachal Pradesh4,3943604,754
10Jharkhand18,2211,49119,712
11Karnataka20,0531,64121,694
12Kerala10,68687411,560
13Madhya Pradesh43,3733,54946,922
14Maharashtra33,7432,76136,504
15Manipur3,9493234,272
16Meghalaya4,2073444,552
17Mizoram2,7832283,011
18Nagaland3,1512583,409
19Odisha25,4602,08327,543
20Punjab9,83480510,638
21Rajasthan32,8852,69035,576
22Sikkim2,1341752,308
23Tamil Nadu23,0391,88524,924
24Telangana11,73296012,692
25Tripura3,8993194,218
26Uttar Pradesh98,6188,0691,06,687
27Uttarakhand6,0724976,569
28West Bengal41,3533,38444,737
 TOTAL 5,49,99745,0005,94,996