इंडिया स्कील्स 2021 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 51 पदकांसह ओडिशा प्रथम स्थानी

नवी दिल्‍ली, ११ जानेवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रीय इंडिया स्कील्स 2021 या भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा आज समारोप झाला. यामध्ये भाग घेतलेल्या 150 जणांचा सत्कार केंद्रीय कौशल्य विकास आणि नवोद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रीय कौशल्य विकास सहकारी संस्थेमार्फत कौशल्य विकास आणि नवोद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत कॉक्रिट बांधकाम, सौंदर्यसाधना, कार पेंटिंग, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, व्हिज्युअल व्यापार, ग्राफिक डिझाईन तंत्रज्ञान, भिंत व जमीनीवर टाईल्स बसवणे अश्या 54 कौशल्यांचा समावेश यामध्ये होता.

इंडियास्किल्स या स्पर्धेने युवकांना त्यांचे व्यक्तिमत्व आणि ओळख अधिक उंचावण्याची  संधी दिली. या स्पर्धेने 26 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील 500 स्पर्धकांना एकत्र आणले.  कौशल्य सादरीकरणाच्या  स्पर्धा विविध ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धा स्थळांमध्ये प्रगती मैदान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अपरिचित स्थळांवर 7 ते 9 जानेवारी या कालावधीत स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि दिल्ली सरकारने कोविड-19 संदर्भात घातलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत  या स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय सुरक्षा नियमांची अंमलबजावणी, अभ्यागतांना वा प्रेक्षकांना प्रवेश नसणे, सामाजिक अंतरपालन, आणि स्पर्धास्थळांचे सातत्याने निर्जंतुकीकरण अशा सुरक्षा नियमावलीचे पालन करत या स्पर्धा झाल्या.  याशिवाय आठ कौशल्यांशी संबधित स्पर्धा 3 ते 5 जानेवारी दरम्यान मुंबई व बेंगळुरू येथे झाल्या.

150 पेक्षा जास्त विजेत्यांपैकी 59 जणांना सुवर्णपदक आणि 1,00,000 रुपयांची रोख रक्कम, 73 जणांना रौप्यपदकासहित 75,000 रुपये तर 53 विजेत्यांना कांस्य पदक आणि 50,000 ची रोख रक्कम देण्यात आली. 50 सहभागींना  उत्कृष्टतेचे पदक देण्यात आले. यावर्षीच्या स्किल इंडिया स्पर्धेने ऑगस्ट-सप्टेंबर 2021मधील 2.5 लाख नोंदणीसह कौशल्य विकासाचा आलेख उंचावला.

The Secretary, Ministry of Skill Development & Entrepreneurship (MSDE), Shri Rajesh Aggarwal addressing at the felicitation ceremony of winners of the India Skills 2021 National Competition, at Talkatora Stadium, in New Delhi on January 10, 2022.

7 ते 9 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय इंडिया स्किल्स ही स्पर्धा चार विभागीय स्पर्धांच्या मागोमाग घेण्यात आली. पूर्व विभाग म्हणजे पाटणा, गांधीनगर हा पश्चिम विभाग, चंदीगढ उत्तर विभाग आणि दक्षिण विभागात विशाखापट्टणम  या ठिकाणी ऑक्टोबर  ते डिसेंबर या कालावधीत या, स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतील स्पर्धांमधून निवडले गेलेल्यांमधून स्थानिक पातळीवर स्पर्धक निवडण्यात आले. राष्ट्रीय इंडिया स्कील्स 2021 च्या  विजेत्यांना आता ऑक्टोबर 2022मध्ये चीनमध्ये भरवण्यात येणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येईल.

Sl.State/UTGoldSilverBronzeMedallionTotal
1Odisha101891451
2Kerala885425
3Maharashtra8471130
4Karnataka784423
5Andhra Pradesh741416
6Bihar425213
7Haryana341311
8Gujarat312511
9Rajasthan311611
10Tamil Nadu288523
11Chandigarh221611
12Punjab14128
13Uttar Pradesh12227
14Madhya Pradesh12 14
15West Bengal111 3
16Delhi 2147
17Jharkhand 21 3
18Uttarakhand 2 13
19Tripura  112
20Assam 1 12
21Goa 1  1
22Mizoram  1 1
23Andaman & Nicobar  1 1
24Himachal Pradesh   11
25Telangana   22
       
  61775379