नांदेडमध्ये कडकडीत बंद,1 हजार 53 व्यक्ती कोरोना बाधित

संचारबंदी काटेकोर पाळू यात – जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे

नांदेड दि. 25 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे जनतेने पालन करीत चांगले सहकार्य केले आहे. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असून पोलीस गरजूंच्या मदतीला तत्पर आहेत, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त करुन धीर दिला.

नांदेड जिल्ह्यात गुरुवार 25 मार्च रोजी 1 हजार 53 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 3 हजार 981 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 489 तर अँटिजेन तपासणीद्वारे 564 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 53 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 36 हजार 555 एवढी झाली आहे.

New Mutant Strain of Corona Virus All You Need to Know - BW Businessworld

बुधवार 24 मार्च रोजी साईनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका महिलेचा, धनेगाव नांदेड येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, गुरुवार 25 मार्च रोजी नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 48 वर्षाच्या पुरुषाचा, भंडारीनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 85 वर्षाच्या महिलेचा, लोहा तालुक्यातील सायाळ येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, होळी नावघाट नांदेड येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे व सोमवार 22 मार्च रोजी कंधार तालुक्यातील उमरगा येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा लोहा कोविड रुग्णालय येथे तर बुधवार 24 मार्च रोजी भावसार चौक नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 683 एवढी झाली आहे.

आजच्या 3 हजार 981 अहवालापैकी 2 हजार 788 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 36 हजार 555 एवढी झाली असून यातील 27 हजार 328 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 8 हजार 311 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 93 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 17, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 441, धर्माबाद तालुक्यांतर्गत 2, कंधार तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 6, नायगाव तालुक्यांतर्गत 4, माहूर तालुक्यांतर्गत 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 14, किनवट कोविड रुग्णालय 8, बिलोली तालुक्यांतर्गत 4, उमरी तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 549 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.75 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 89 हजार 489एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 46 हजार 873एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 36 हजार 555एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 27 हजार 328एकुण मृत्यू संख्या-683उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.75 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-109आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-414रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8 हजार 311आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-93.