सिल्लोड आणि सोयगांव तालुक्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करा- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद, ,२७मे /प्रतिनिधी :- सिल्लोड आणि सोयगांव तालुक्यांची ओळख विकासाच्या माध्यमातून निर्माण होण्याकरिता रस्त्यांची कामे ही गुणवत्तायुक्त झाली पाहिजे. रस्त्याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तिव्र असून रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटून त्यांचा विकास  होण्यास मदत होईल, त्यामुळे दुसऱ्या टप्यातील उर्वरीत कामे प्राधान्याने पुर्ण करा असे निर्देश महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

Displaying IMG-20210527-WA0032 (1).jpg

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सिल्लोड सोयगांव मतदारसंघातील विविध विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बोलत होते. बैठकीला सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समिर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त (विकास) डॉ. अविनाश गोटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कवडे, सहाय्यक उपायुक्त (नियोजन) विना सुपेकर, जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता अशोक भोसले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदी योजनेंतर्गत रस्त्यांची कामे ही नियोजनबध्द पध्दतीने करा जेणेकरून सिल्लोड, सोयगांव, फर्दापूर, आणि अजिंठा तालुक्याचा विकास झाला म्हणजे जागतिक पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असे सांगून श्री. सत्तार म्हणाले की सिल्लोड-फर्दापूर-अजिंठा रस्त्यांच्या कडेला झाडे, पथदिवे लावून सुशोभिकरण करा, प्रत्येक वर्षात किमान 100 कि.मी. रत्यांचे डांबरीकरण कसे होईल याचे नियोजन करा तसेच रस्त्यांचे आयुष्य कसे वाढविता येईल याकडे देखिल कटाकक्षाने लक्ष देणे गरजेचे असून खडीच्या रस्त्यावर त्वरीत डांबरीकरण करण्याचे निर्देशीत करत सिल्लोड सोयगांव मधील एकही रस्ता खराब दिसता कामा नये, तसेच सिल्लोड डोंगरगाव येथील रस्त्याचे डांबरीकरण करुन रस्त्यामुळे भविष्यात अडचण येणार नाही अशा सूचना देत केळगाव व बोझगाव पुलांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत श्री. सत्तार यांनी रस्त्याचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशा सूचना संबंधितांना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, यांनी रस्ते तयार करताना रस्तानोंदणी करणे गरजेचे असून दुसऱ्या टप्यातील राहिलेली रस्त्याची कामे, पुलांची कामे त्वरीत पुर्ण करावीत. त्याचबरोबर रस्ते तयार करणाऱ्या संबंधित विभागाने रस्त्याची देखभाल, संवर्धन करावे अशा सूचना देत कोविडची तिसरी लाट येण्याच्या आत सोयगांव येथील कोविड सेंटर हे सर्वसोई युक्त करावे,  त्याचबरोबर अतिवृष्टी / पुरहानी झालेल्या रस्ते व पुलाच्या कामाच्या दुरुस्ती करिता जिल्हा वार्षिक योजनेतून दहा टक्के निधी उपलब्ध ठेवण्याच्या सूचना करत  श्री. सत्तार यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण मार्ग, राष्ट्रीय महामार्ग इतर जिल्हा मार्ग (ओ.डी.आर.) सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अर्थसंकल्पीय कामाचा सविस्तर आढावा  घेतला.