पोलिस अधिका-याच्या वेतनातून पाच हजार रुपये वसूल करण्याचे आदेश
औरंगाबाद/प्रतिनिधी
नांदेड येथील मुंदडा चिट फंडप्रकरणात आदेशानंतरही सुनावणीला गैरहजर राहणा-या आणि आरोपीविरोधात कारवाई न करणा-या तपास अधिका-याच्या वेतनातून पाच हजार रुपये वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. बी. यु. देबदवार यांनी दिले.
नांदेड येथील गणेश गोपालदास मुंदडा व त्याच्या साथीदारांनी मुंदडा चिट फंडद्वारे गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखविले होते. त्याच्याआमिषाला बळी पडून जिह्यातील हजारो गुंतवणूकदारांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. मात्र रक्कम जमा करुन आरोपी पळून गेला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांच्या आदेशानंतर आरोपीविरोधात जानेवारी २०१९ मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड येथील वजीराबाद पोलीसांनी आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई न केल्याच्या कारणावरुन प्रवीण काकाणी यांच्यासह इतर गुंतवणुकदारांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. अॅड. प्रसाद डी. जरारे यांनी याचिकाकर्त्यांच्यावतीने जोरदार युक्तीवाद केला. खंडपीठाने २१ जानेवारी २०२१ रोजी आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व चीट फंड अधिकाºयांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. पण सुनावणीला तपास अधिकारी हजर झाले नाहीत. न्यायालयाने त्यांना स्पष्टीकरणासह हजर राहण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली असता, तपास अधिकारी श्रीमती एस.आर. मुंडे या हजर झाल्या. त्यांनी गैरहजेरीबाबतचे लेखी स्पष्टीकरण दिले.