सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग, दिवसभरात १४ षटकार आणि ८२ चौकार 

बालाजी, रेयॉन, आरके संघ विजयी

औरंगाबाद, दिनांक 16 :सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग’च्या तिसऱ्या दिवशी बालाजी वॉरिअर्स, रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्स आणि आर.के. वॉरिअर्स संघांनी अनुक्रमे चंद्रा मीडिया इलेव्हन, दिग्विजय स्टायकर्स आणि साई ॲडव्होकेट डॉमिनेटर्स संघांचा पराभव केला. एमजीएमच्या क्रिकेट मैदानात मंगळवारी (ता. १६) हे सामने झाले. यात समीर सोनवणे, निखील देशमुख, राजू मदन यांनी सामनावीराचा मान पटकावला. दिवसभरातील सामन्यांमध्ये फलंदाजांनी १४ षटकार आणि ८२ चौकार सीमापार धाडले.

Displaying IMG_6409.JPG

दिवसाच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना चंद्रा इलेव्हनच्या अमोल म्हस्के (३७ धावा), शरद पठाडे (३६) आणि संदीप (३५) यांच्या खेळीच्या जोरावर सहा बाद १२३ धावसंख्या उभारली. गोलंदाजीचा मारा करताना समीर सोनवणे यांनी तीन तर संदीप घोरडे यांनी दोन गडी बाद केले. बालाजी वॉरिअर्सने हे आव्हान अतुल वालेकर यांच्या १३ चेंडूत ३५ आणि अभय भोसले यांच्या २१ चेंडूत ३५ धावांच्या खेळीने १३ षटकात चार गडी राखुन पुर्ण केले. संदीप आणि अमोल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Displaying IMG_6496.JPG
Displaying IMG_6563.JPG


रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्सने दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी १५ षटकात आठ बाद १४१ धावसंख्या उभारली. निखील देशमुख यांनी १८ चेंडूत ४२ धावांची वादळी खेळी केली. अमित राजळे यांनी (२९ धावा), सतीश शेळके (२२), भाग्येश म्हस्के (१४) यांनी साथ दिली. प्रत्युत्तरात दिग्विजय स्ट्रायकर्सचा संघ निर्धारित षटकात सात बाद १०८ धावाच करू शकला. यात श्‍याम कदम यांनी ३५ चेडुंत ५८ धावा काढल्या. विनोद अहेर (२२) आणि महेंद्र यांनी १३ धावा काढल्या. 
साई ॲडव्होकेट डॉमिनेटर्सकडून खेळताना अजय शितोळे यांनी ४७ चेंडूत ७३ धावा काढल्या. निखील घुणावत यांनी २३ धावा काढल्याने संघाला १५ षटकात सहा बाद १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याविरुद्ध आर.के. वॉरिअर्स संघाने हे आव्हान पाच चेंडू आणि सहा गडी राखून पुर्ण केले. राजू मदन यांनी ३४ चेंडूत ५० धावा काढल्या. संजय बनकर (२२), भास्कर (१७), शशांक चव्हाण (१३) यांनी विजयात योगदान दिले. मनोज शिंदे आणि अजय शितोळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.