‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला) एकांकिका प्रकारात  धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय उदगीर प्रथम  

छत्रपती संभाजीनगर ,२४  एप्रिल / प्रतिनिधी :-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला) स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा छ्त्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला.     

दोन दिवसीय ‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला) बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे डॉ. मिलिंद निकुंभ (प्रति कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) हे अध्यक्षस्थानी तर डॉ. दत्ता पाटील (प्राचार्य, धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय, उदगीर), डॉ. मनोजकुमार मोरे (संचालक, विदयार्थी कल्याण विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), 

डॉ. फुलचंद अग्रवाल (उपरजिस्ट्रार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), डॉ. श्रीकांत देशमुख  (प्राचार्य, CSMSS आयुर्वेद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर ) डॉ. राहुल शिंदे, डॉ. श्रीराम गरड  (समन्वयक, स्पंदन २०२३) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.  छत्रपती संभाजीनगर येथे दि. २२ व २३ एप्रिल रोजी छ्त्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला) मोठ्या उत्साहात पार पडला . छत्रपती संभाजीनगर विभागासाठी नाट्यकला प्रकारात एकांकिका, विडंबन नाट्य, मुकअभिनय (समूह) आणि मिमिक्री हे कलाप्रकाराचे सादरीकरण महाराष्ट्रातील ३२ महाविद्यालयाच्या जवळपास ३७५ विद्यार्थ्यांनी केले.

‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला) निकाल

१) एकांकिकाप्रथम : धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय, उदगीर द्वितीय : श्री. सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेज, नाशिक तृतीय : डी. एस. होमीओपॅथिक कॉलेज, पुणे
२) विडंबन नाट्यप्रथम : CSMSS दंत महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर द्वितीय : SMBT मेडिकल कॉलेज, इगतपुरी तृतीय : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव

३) मूकअभिनय (समूह )प्रथम :  SVNHTआयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, राहुरी   द्वितीय : सुरटेक कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर  तृतीय : राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिंग कॉलेज, कोपरगाव 

४) मिमिक्री प्रथम : डॉ. दिपक पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पन्हाळा द्वितीय : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव 

तृतीय :SVNHTआयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, राहुरी

५) पथनाट्य / पथसंचलनप्रथम : CSMSS आयुर्वेद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर द्वितीय : SVNHTआयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, राहुरीतृतीय :धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय, उदगीर


५) संघ व्यवस्थापक स्पर्धा  
प्रथम : 

डॉ. यशश्री वितोंडे -गझल गायन (CSMSS आयुर्वेद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)द्वितीय : डॉ. मिलिंद कांबळे -स्वरचित कविता  (

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव)

 तृतीय : डॉ. ज्योती चोपडे –

स्वरचित कविता (SVNHTआयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, राहुरी)सहभाग  :डॉ. ओंकार पाठक –

स्वरचित कविता (BSTD 

आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली )

स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. किशोर शिरसाट, सौ. स्मिता साबळे, प्रो. गजानन दांडगे, अँड. पदमनाथ पाठक, अँड. सुजाता पाठक,डॉ. योगिता तळेकर, श्री. दत्ता जाधव, डॉ. वैशाली बोधले, प्रो. नितीन गरुड, श्री. रवी कुलकर्णी, डॉ. अजय मगर, डॉ. रुपाली म्हस्के यांनी काम पाहिले. महाराष्ट्र्रभर ‘स्पंदन २०२३’ लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) यांच्या संकल्पनेतून होत आहे. 

स्पंदन-२०२३’ (नाट्यकला)  छ्त्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे, संस्थेचे सचिव श्री. पद्माकरराव मुळे व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला .      यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. अमित वांगीकर, प्राचार्य डॉ. संदीप कांबळे, प्राचार्य डॉ. शीतल अंतापूरकर, प्राचार्य डॉ. वैजनाथ यादव, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, आयुर्वेद महाविद्यालय शैक्षणिक प्रमुख डॉ. जयश्री देशमुख, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील, विभागप्रमुख आणि महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, स्पर्धक, नाट्यरसिक आदी उपस्थित होते.