टुलकिट प्रकरणात शंतनु मुळुकला शंतनुला तात्पुरता दिलासा

Image result for high court aurangabad

औरंगाबाद, दिनांक 16 :

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळक (रा. बीड) याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. या प्रकरणात शंतनु मुळुक याला अटकेपासून संरक्षण देत दहा दिवसांचाा ट्रां . टू  अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी मंजूर केला. टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली आहे. न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीदरम्यान ४हणणे मांडण्यात आले असून आपले अबाधित  स्वातंत्र्य राखणे आपला हक्क असून न्यायालयापुढे सत्य मiडण्याकरिता आपल्याला न्यायालयापुढे हजर राहायचे आहे. हे प्रकरण दिल्ली न्यायालयापुढे सुरू असल्याने त्याची गुणवत्ता निश्चित करण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. शासनातर्फ या अटकपूर्व ट्राझिट देण्यास विरोध करण्यात आला. सुनावणीअंती न्यायालयाने मूळ प्रकरणाच्या गुणवतेवर कोणतेही भाष्य न करता याचिका का त्र्याला दहा दिवसाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात याचिका क(र्यांच्या वतीने अॅड. सतेज जाधव तर शासनाच्या वतीने अॅड. एस वाय महाजन यांनी काम पाहिले…….
दरम्यान,अटक करण्यात आलेल्या दिशावर शेतकर्‍यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूल किट ट्विट केले होते.
 सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या निकिता जेकब  यांच्या विरोधातदेखील अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून,  पोलिसांच्या कारवाईपासून बचावासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.